पुणे : विश्वकर्मा कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स (VCACS) आणि रेड प्लस ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराला (Blood Donation Camp) समाजाकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. या शिबिरात १५० हून अधिक रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत समाजसेवेचा एक उत्कृष्ट संदेश दिला.
शिबिरादरम्यान प्रत्येक रक्तदात्याला डिजिटल घड्याळ, इअरफोन्स, हेल्मेट आणि प्रमाणपत्र भेट म्हणून देण्यात आले. याशिवाय, भविष्यातील आपत्कालीन परिस्थितीत रेड प्लस ब्लड सेंटरकडून मोफत रक्त मिळण्याची सुविधा देण्यात आली आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. अरुण पाटील, डॉ. अंजुम पटेल, डॉ. सुधी चिटणीस आणि डॉ. शीतल मंत्री यांच्या उपस्थितीत करण्यात आले. याशिवाय, डॉ. जयस्वाल आणि डॉ. शिंदे यांनीही या शिबिराला मोलाचे योगदान दिले.
डॉक्टरांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “रक्तदान ही सर्वश्रेष्ठ समाजसेवा आहे, आणि प्रत्येक व्यक्तीने या कार्यात सक्रिय सहभागी व्हावे.”
रेड प्लस ब्लड सेंटर आणि विश्वकर्मा कॉलेज परिवार यांनी आयोजित केलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांवरून कौतुक होत आहे. या शिबिराच्या यशस्वी आयोजनाने महाविद्यालयाने सामाजिक जबाबदारीचे उत्कृष्ट उदाहरण प्रस्थापित केले आहे.