Monday, June 24, 2024

उद्धव ठाकरे यांना भगव्याचे वावडे का?

Share

वास्तविक राजकीय व्यक्तीचे निवडणूक प्रचार काळातील एखादे वक्तव्य विचारात घेऊन त्याचा प्रतिवाद करण्याची आवश्यकता नाही व मला ती गोष्ट एवढी महत्त्वाचीही वाटत नाही. पण एक अत्यंत बेजबाबदार राजकारणी, उद्धव ठाकरे यांनी एक वक्तव्य केले की रा. स्व. संघाचे भगवे फडके आम्ही देशाचा झेंडा होऊ देणार नाही इ.

यातील रा. स्व. संघाचे भगवे फडके हा संघाचा विषय अजिबात महत्त्वाचा नाही परंतु भगवा हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण संघाचा भगवा ध्वज हे संघाचे पेटंट नाही परंतु ते हिंदू समाज, धर्म व संस्कृती यांचे पेटंट आहे. म्हणून अत्यंत बालिश असूनही उध्दव ठाकरे यांच्या विकृत, बेताल वक्तव्याचा व वर्तनाचा समाचार घेणे गरजेचे आहे. राजकीय अस्तित्वाच्या लढाईला आधार म्हणून स्वीकारलेल्या हिंदुत्वाची किंचितही माहिती उद्धव ठाकरे यांना नाही हे त्यांनी परत एकदा स्पष्ट केले.

भगवा ध्वज हा कोणत्याही संस्थेचा अधिकार नाही. तो या देशाच्या पारंपरिक मूल्यांचा मार्गदर्शक आहे. म्हणून भगवा ध्वज, रंग कुठे दिसतो हे आपण समजून घेऊ या. कारण उद्धव ठाकरे या अभ्यास शून्य माणसाला काही शिकवणे म्हणजे फक्त पालथ्या घड्यावर पाणी. पण जे थोडे हिंदू या कणाहीन नेत्याकडे अपेक्षेने पहात आहेत त्यांचे जागरण आवश्यक आहे. ज्या भगव्या झेंड्याची, फडके म्हणून अवहेलना केली ते भगवे फडके गत दहा हजार वर्षे मानवाला मानवतेचे संस्कार देत आहे.

त्यागाचे प्रतीक आणि समाजाचे निस्पृह मार्गदर्शक हिंदू ऋषि मुनी हे या भगव्या वस्त्रात लिप्त असतात. भगवा वस्त्रधारी म्हणूनच पदस्पर्श योग्य अधिकारी व्यक्ती असतो. भगवा रंग न सांगता त्यागाचे स्मरण करतो. रामायण व महाभारतात तो धर्माची बाजू घेऊन उभा रहातो. योग्य, चांगली धर्म्य बाजू म्हणजे राम व कृष्ण. म्हणून भगवा ध्वज त्या बाजूला. संस्कृती, नैतिकतेचे प्रतिक म्हणजे भगवा ध्वज. आधुनिक काळात स्वकीय परकीय ठरवणारा मापदंड म्हणजे भगवा ध्वज. राष्ट्रीयत्वाची व्याख्या म्हणजे भगवा ध्वज. छत्रपती शिवाजी महाराज यांचा ध्वज भगवा, राणा प्रतापांचा ध्वज केसरिया तर अकबर, औरंगजेब, बाबर यांचा ध्वज हिरवा. भगवा राष्ट्रीयते बरोबर तर देशाचा शत्रू भगव्या विरूद्ध. राष्ट्रीयतेविरुद्ध कोण? व बाजूने कोण याची साधी सोपी व्याख्या म्हणजे भगवा ध्वज.

विवेकानंदांनी जगाला जी वैश्विक एकात्मेची हिंदू संकल्पना समजावून सांगितली ती पटवून देण्यासाठी जी सनातन संस्कृती सांगितली ती ही भगवा ध्वज संस्कृती होती. या महान तत्वांचे प्रतीक म्हणजे भगवा ध्वज. तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पेटंट नाही. एखाद्या संस्थेच्या व्याख्येत मावेल एवढा तो ध्वज लहान नाही. पूर्ण विश्वाला गवसणी घालणारा भगवा ध्वज आहे.

हे उद्धव ठाकरे यांना समजण्याचे कारण नाही कारण जो माणूस अभ्यासाचा विरोधक आहे त्याच्या कडून असल्या अपेक्षा करताही येत नाहीत. जो माणूस वडिलोपार्जित संपत्ती उपभोगत आहे त्याला या भगव्याचे त्यागमय तेज काय कळणार? श्रीराम मंदिराच्या जागी असलेल्या हिरव्या पापस्थानाला हुसकवण्यासाठी ५०० वर्षे हिंदू रक्त का सांडत होते, हे या अडाणी नेत्याला कळणार नाही. या त्यागाच्या रक्तातून हा भगवा उभा आहे हे या उन्मत्त उद्धव ठाकरे यांना कळणार नाही. ज्ञान, ओज यांनी भारताची विद्वत्ता व विज्ञान प्रगती याचा सूर्य प्रकाशी साक्षीदार भगवा तर या शहामृगी वृत्तीच्या ठाकरे घराण्याला कळण्याची सूतराम शक्यता नाही.

प्रश्न उद्धव ठाकरे यांचा नाही तर त्या त्यागमय भगव्याची पूजा करतात त्या सामान्य जनतेचा आहे की उद्धव ठाकरे तुमच्या जाज्वल्य राष्ट्र भावनेशी खेळत आहेत, तुमच्या सनातन हिंदू धर्म प्रेमाशी खेळत आहेत. म्हणून मी उद्धव ठाकरे यांचा निषेध करत आहे व अद्यापही उद्धव ठाकरे यांच्या बाजूने जे हिंदू आहेत त्यांच्या जागरणाचा प्रयत्न करीत आहे.

भगवा रा. स्व. संघाचे पेटंट नाही. तो देशाचे, देशभक्तीचे, त्यागाचे तसेच ज्ञानाचे प्रतीक आहे. म्हणून त्याची फडके म्हणून टिंगल करणा-याला त्याची जागा दाखवून देऊ या.

सुनील देशपांडे
(लेखक ब्लॉगर असून ते विविध सामाजिक विषयांवर लेखन करतात.)

अन्य लेख

संबंधित लेख