Wednesday, November 13, 2024

ही दोस्ती भुलायची नाय…मित्राच्या बंदोबस्ताला मित्र…

Share

‘दोस्ती भुलायची नाय’…धडाकेबाज चित्रपटातील लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यांच्यावर चित्रीत हे गाणे काल बऱ्याच लोकांना आठवले. श्री मुरलीधर मोहोळ केंद्र सरकारमध्ये सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री म्हणून नियुक्त आहेत. सामान्य माणसातील एक असे आपल्या कामाचे स्वरुप, कुठलाही बडेजाव न राखता आपल्या तालमीतील मित्राला ओळख दाखवणे आणि आपल्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलीस मित्राच्या गळ्यात पडणे हे मैत्रीचे रुप मुरलीधर मोहोळ यांचे जमिनीवरील पाय किती पक्के आहेत हेच दर्शवते.

मा मोहोळ संघटनात्मक दौऱ्यानिमित्त काल कोल्हापूर जिल्ह्यात गेलो असता त्यांच्या सुरक्षेसाठी लावलेल्या पोलिसांच्या सुरक्षा बंदोबस्तात कोल्हापूर पोलीस दलात काम करणारे कोल्हापूरच्या तालमीतील मित्र श्री. शहाजी पाटील अचानक समोर आले. शहाजी दिसताच ताफा थांबवत त्याची भेट घेतली आणि संवाद साधला.

हा मोठेपणा राजकीय प्रवासात यश मिळवून देईल यात शंका नाही. इतक्या वर्षांनी अचानकपणे झालेली ही भेट सुखद धक्का देणारी ठरली. इतकंच नाही तर त्याला पाहाताक्षणी तालमीत असतानाच्या आठवणींचा पट क्षणार्धात डोळ्यासमोर उभा राहीला.

अन्य लेख

संबंधित लेख