भारतास स्वातंत्र्य मिळाल्या नंतर १९५४ साली काँग्रेस सरकारच्या काळात वक्फ चा कायदा आणला गेला. विविध राज्यांमध्ये वक्फ बोर्डाची स्थापना केली गेली. महाराष्ट्रात १९६० साली या कायद्यानुसार वक्फ बोर्डाची निर्मिती झाली. आजमितीस देशातील सर्व ‘वक्फ’ बोर्डाकडे आठ लाख एकरपेक्षा जास्त जमिनीवर पसरलेल्या एकूण 8 लाख, 54 हजार, 509 मालमत्ता आहेत. महाराष्ट्रात मागील ६४ वर्षात वक्फ बोर्डाकडे एकूण ९२ हजार एकर जमीन जमा झाली आहे. याचाच दुसरा अर्थ दरवर्षी वक्फ बोर्डकडे १५०० एकर जमीन नवीन नावावर होते. इस्लामिक शरिया कायद्याप्रमाणे एकदा वक्फ झालेली जमीन कोणत्याही परस्थितीत परत त्या देशाच्या सरकारकडे जात नाही. ती संपत्ती कायमस्वरूपी इस्लामची आहे. त्यावर कोणताही भारतीय कायदा लागू होत नाही. याचे दूरगामी परिणाम म्हणजे भारतात दुसऱ्या इस्लामिक राष्ट्राची पेरणी होऊ शकते.
Share
अन्य लेख