Thursday, October 10, 2024

Acharya Chanakya Skill Development Centre: पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार 1 हजार आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन

Share

महाराष्ट्र राज्यातील 1000 आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे (Acharya Chanakya Skill Development Centre) ऑनलाईन उद्घाटन पंतप्रधाननरेंद्र मोदी (Prime Minister Modi) यांच्या शुभहस्ते दुरदृश्य प्रणालीद्वारा उद्या म्हणजे 20 सप्टेंबर 2024 रोजी वर्धा इथून होणार आहे. यामध्ये सोलापूर जिल्हयातील 26 महाविद्यालयांचा समावेश आहे.

कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक लाभ राज्यातील युवक युवतींना व्हावा, या दृष्टीकोनातून
राज्यामधील नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र (Acharya Chanakya Skill Development Centre) स्थापन करुन महाविद्यालयीन युवक युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीने प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान योजनेच्या धर्तीवर राज्यातील नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य केंद्रांची (Acharya Chanakya Skill Development Centre) स्थापना करण्यात येत आहे. या केंद्रामार्फत 15 ते 45 वयोगटातील बेरोजगार युवक युवतींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राकरिता (Acharya Chanakya Skill Development Centre) सोलापूर जिल्हयामधील निवड झालेल्या महाविद्यालयांचे केंद्र शासनाच्या स्कील इंडिया डिजिटल हब या वेबपोर्टलवर प्रशिक्षण केंद्रांना मान्यता घेण्यात येणार असुन प्रत्येक प्रशिक्षण केंद्रात साधारण 150 युवक युवतींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत सोलर एलईडी तंत्रज्ञ, घरगुती डेटा एंट्री ऑपरेटर, डेअरी शेतकरी/उद्योजक, डेअरी कामगार, शेळी/मेंढी शेतकरी, डेटाबेस प्रशासक, वेब डेव्हलपर, सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह, लेखा सहाय्यक, सर्वेक्षक, ड्राफ्ट्समन मेकॅनिकल, ड्राफ्टस्पर्सन सिव्हिल वर्क्स, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, जनरल ड्युटी असिस्टंट, हेल्थकेअर हॉस्पिटल फ्रंट डेस्क कोऑर्डिनेटर अशा प्रकारच्या 52 प्रकारांत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

अन्य लेख

संबंधित लेख