Tuesday, December 30, 2025

मेट्रो अडवली अन् मुंबई खड्ड्यात घातली! खड्डे, मेट्रो आणि घरांच्या मुद्द्यावरून भाजपने ठाकरेंना धुतले

Share

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एका जळजळीत ट्विटद्वारे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर टीका करत, देवेंद्र फडणवीस यांच्या विकासकामांचा गौरव केला आहे. “मुंबईकर घोषणांची नाही, तर अनुभवाची आणि निकालाची निवड करतो,” अशा शब्दांत उपाध्ये यांनी भाजपचा अजेंडा स्पष्ट केला आहे.

केशव उपाध्ये यांनी आपल्या पोस्टमध्ये देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या कामाची थेट तुलना केली आहे. त्यांनी खालील महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत.

▪️ज्यांनी मेट्रो आणली, प्रवास सुखकर केला — देवेंद्रजी
▪️आणि ज्यांनी मेट्रो अडवली — उध्दव ठाकरे

▪️ज्यांनी कोस्टल रोडसारखे विकास प्रकल्प उभे केले — देवेंद्रजी
▪️आणि ज्यांच्या काळात दर पावसाळ्यात मुंबई खड्ड्यांत बुडाली — उध्दव ठाकरे

▪️ज्यांनी बीडीडी चाळीतील मराठी कुटुंबांना हक्काची घरे दिली — देवेंद्रजी
▪️आणि ज्यांनी नुसते “मराठी”चे घोष लावले — उध्दव ठाकरे

“मुंबईकर आता केवळ भावनांवर नाही, तर विकासावर आणि सुरक्षिततेवर मतदान करतो. तो आपल्या भविष्यासाठी मतदान करतो. आणि त्याचे उत्तर स्पष्ट आहे—मुंबई विकासासोबत म्हणजेच देवेंद्रजींसोबत आहे!”

मुंबईत ‘फ्युचरिस्टिक’ राजकारणाची नांदी
या ट्विटच्या माध्यमातून भाजपने आगामी निवडणुकीत ‘विकासाचा मुद्दा’ केंद्रस्थानी ठेवल्याचे दिसून येत आहे. “मुंबईचा विकास रोखणाऱ्यांना” बाजूला सारून “प्रकल्प पूर्ण करणाऱ्या” नेतृत्वाला म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांना साथ देण्याचे आवाहन यानिर्णय भाजप जनतेला करत आहे.

अन्य लेख

संबंधित लेख