Saturday, January 3, 2026

नांदेड : ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादुर साहिबजी ३५० वा शहीदी समागम कार्यक्रम २५ जानेवारीला

Share

नांदेड : धर्मरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड नगरीत २५ जानेवारी रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक सोहळ्याची औपचारिक सुरुवात ३ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता ‘आरंभता की अरदास’ या विधीने होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मोदी मैदानावर (असर्जन परिसर मामा चौक) हा विधी पार पडणार आहे.

नऊ समाजांच्या संतांची उपस्थिती ठरणार खास
३ जानेवारीचा ‘आरंभता की अरदास’ विधी तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वाराचे पंचप्यारे यांच्या हस्ते पार पडेल. या विधीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात सिख, सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मीकि, भगत नामदेव आणि उदासीन अशा नऊ विविध समाज-संप्रदायांच्या संतांची प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

धार्मिक नेतृत्वात सोहळ्याचा प्रारंभ
तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वाराचे मुख्य जथ्थेदार संत बाबा कुलवंत सिंघजी, भाई जोसिंदर सिंघजी, भाई राम सिंघजी यांच्यासह गुरुद्वारा लंगर साहिबचे संत बाबा बलविंदर सिंघजी यांच्या हस्ते या उपक्रमाचा औपचारिक प्रारंभ केला जाईल.

तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा अबचलनगर नांदेड, मुख्य जथ्थेदार संत बाबा कुलवंत सिंघजी, भाई जोसिंदर सिंघजी, भाई राम सिंघजी, भाई कश्मिर सिंघजी, भाई गुरमीत सिंघजी, गुरुद्वारा लंगर साहिबचे संतबाबा बलविंदर सिंघ यांच्या हस्ते “हिंद-दी-चादर” उपक्रमाचा औपचारिक प्रारंभ केला जाईल.

प्रशासकीय तयारीला वेग
२५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे.

यावेळी महेंद्रजी रायचुरा, विधान परिषद सदस्य बाबुसिंग महाराज, क्षेत्रीय समिती अध्यक्ष डॉ. विजय सतबीर सिंग, हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, सरजीत सिंघ गिल आणि जिल्हाधिकारी राहूल कर्डीले, पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार, क्षेत्रीय समिती पदाधिकारी, इतर वरिष्ठ अधिकारी व राज्यस्तरीय समिती सदस्य इतर अधिकारी यांची उपस्थिती राहणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी सुरक्षा, वाहतूक व्यवस्था आणि कार्यक्रमस्थळाच्या व्यवस्थापनाबाबत सर्व यंत्रणांना कडक सूचना दिल्या आहेत. या शहीदी समागम वर्षानिमित्त केवळ नांदेडच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक या सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. श्री गुरु तेग बहादूर साहिबजींच्या बलिदानाचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

अन्य लेख

संबंधित लेख