Join our community of SUBSCRIBERS and be part of the conversation.

To subscribe, simply enter your email address on our website or click the subscribe button below. Don't worry, we respect your privacy and won't spam your inbox. Your information is safe with us.

32,111FollowersFollow
32,214FollowersFollow
11,243FollowersFollow

News

Company:

Friday, May 16, 2025

“औरंगजेब किंवा याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणं कधीही चांगलं”

Share

Maharashtra Politics : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निवडणुकीत रामराम करत फिरत आहेत’, असे म्हणत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) सडकून टीका केली. विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची सभा रत्नागिरी येथे झाली होती यावेळी उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपवर (BJP) टीका केली होती. 

‘औरंगजेब किंवा याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणं कधीही चांगलं’., असं म्हणत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे.

‘हिंदुह्रदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे हिंदुत्ववादी भूमिका घेऊन जगले पण तुम्ही आता राष्ट्रविरोधी विचारांना साथ देत आहात. सत्ता गेल्यानंतर तुम्हाला कोकणवासीयांची आठवण झाली. अडीच वर्षे सत्तेच्या काळात कोकणला दमडीही दिली नाही. उलट चांगल्या प्रकल्पांना विरोध केला आणि ही देवभूमी विकासापासून वंचित ठेवली. आता फक्त मतं मिळविण्यासाठी तुम्हाला कोकणची आठवण झाली.’ , असा आरोपही त्यांनी केला.

कोकण वादळात सापडलं तेव्हा तुम्ही घरात बसून होतात तर देवेंद्र फडणवीसजी आणि नारायण राणे साहेब कोकणात येऊन लोकांना आधार देत होते. महापूर आला तेव्हा तुमच्या लोकांनी केलेली गुंडगिरी कोकणी माणूस विसरला नाही. मोदीजी आणि नारायण राणेजींच्या प्रयत्नातून कोकणचा विकास होतोय. आता तुम्ही कितीही थापा मारल्या तरी कोकणी माणूस तुमच्या खोट्या भूलथापांना बळी पडणार नाही. असा टोला त्यांनी एक्स वर लिहून उद्धव ठाकरेंना लावला. 

अन्य लेख

संबंधित लेख