MS Dhoni : यावर्षीच्या आयपीएल 2024 मधील चेन्नई सुपर किंग्जचे आव्हान आता संपुष्टात आलंय. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नईचा धुव्वा उडवत प्लेऑफमध्ये धडक मारली. पराभवामुळे चेन्नईचं प्लेऑफचं स्वप्न अधुरं राहिलं. त्यानंतर सर्वांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झालाय. तो म्हणजे महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आता निवृत्ती घेणार का? अशात महेंद्रसिंह धोनीने सोशल मीडियाद्वारे आपल्या नव्या निर्णयाबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे. धोनीने फेसबूकवर 3 वाक्यांची पोस्ट केली आहे.
धोनीने या पोस्टमधून मोठी घोषणा केली आहे. “झेप घेण्याची वेळ आहे. जे महत्त्वाचे आहे ते करण्याची वेळ आली आहे. मी माझी स्वत:ची टीम सुरु करत आहे!” अशी पोस्ट महेंद्रसिंह धोनीने फेसबूकवर केली आहे. आता धोनीची नवी टीम कोणती असणार? ती टीम क्रिकेट संबंधित असणार की आणखी काही? याबाबतची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना आणि धोनीच्या फॉलोवर्सला आहे. अशात त्याची ही पोस्ट चर्चेत आलीये.
या पोस्टमध्ये धोनीने फ्रेंच वाहन उत्पादक कंपनी Citroen सिट्रॉन ला टॅग केले आहे. नुकतेच या कंपनीने धोनीला ब्रँड अम्बॅसेडर म्हणून नियुक्त केले आहे. या भागीदारीसाठी कंपनीने महेंद्रसिंग धोनीला ७ कोटी रुपये दिल्याची चर्चा आहे.