Sunday, November 24, 2024

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत 11 जागांसाठी मतदान सुरू

Share

महाराष्ट्र : विधानपरिषदेच्या 11 सदस्यांचा सहा वर्षांचा कार्यकाळ 27 जुलै रोजी संपणार आहे, त्या जागा भरण्यासाठी आज मतदान पार पडत आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत (Maharashtra Legislative Council Election) 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. राज्य विधानसभा सदस्य दक्षिण मुंबईतील विधान भवन संकुलात सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होईल. सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होणार आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी गुप्त पद्धतीने मतदान होत आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या तीन महिन्यांपूर्वी विधान परिषदेच्या निवडणुका होत आहेत, त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. सर्वच पक्षांनी आपापल्या विजयाची रणनीती आखली आहे.

11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत (Legislative Council Elections) विधानपरिषद निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीने 9 उमेदवार उभे केले आहेत. भाजपने 5 उमेदवार उभे केले आहेत. यामध्ये पंकजा मुंडे, योगेश टिळकर, परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत यांचा समावेश आहे. यासोबतच भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने माजी लोकसभा सदस्य कृपाल तुमाने आणि भावना गवळी हे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. तर राष्ट्रवादीने शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांना तिकीट दिले आहे. विरोधी पक्ष महाविकास आघाडीने राज्यात 3 उमेदवार उभे केले आहेत.

एका जागेसाठी किती मते लागतात?

महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. विधानसभेचे सध्याचे संख्याबळ 274 आहे. अशा स्थितीत विधानपरिषदेची एक जागा जिंकण्यासाठी एकूण 23 मतांची गरज आहे.

अन्य लेख

संबंधित लेख