Friday, January 3, 2025

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी सर्वाधिक निधी; ग्रामीण आणि शहरी भागांसाठी 3 कोटी नवीन घरे

Share

नवी दिल्ली, 23 जुलै, 2024 – परवडणाऱ्या घरांना महत्त्वपूर्ण चालना देण्यासाठी केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) य्यानी आज आपल्या बजेट (Budget2024 ) भाषणात या कच्च्या घरामध्ये राहणारे लोकांसाठी सर्वात मोठी घोषणा केली आहे. केंद्रीय बजेट 2024-2025 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना (Pradhan Mantri Awas Yojana) अंतर्गत 3 कोटी अतिरिक्त घरे तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही योजना चालू आर्थिक वर्षात 10 दशलक्ष कोटी रुपये खर्च होणार आहे. या बजेटमध्ये सर्वात मोठी रक्कम ही या योजनेसाठी खर्च केली जाणार आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी अर्थसंकल्प सादर करताना सर्वांसाठी घरे देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकला. 2015 मध्ये सुरू करण्यात आलेली PMAY योजना लाखो भारतीयांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यात महत्त्वाची ठरली आहे.

प्रधानमंत्री आवास योजना PMAY म्हणून ओळखली जाते. केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या PMAY योजनेचे उद्दिष्ट हे आहे की देशातील प्रत्येकाकडे स्वतःचे कायमस्वरूपी घर असावे. या योजनेत, सरकार एकतर लाभार्थीसाठी कायमस्वरूपी घर बांधते किंवा कायमस्वरूपी घर बांधण्यासाठी आर्थिक मदत करते.

PMAY अंतर्गत गेल्या 10 वर्षांत गरीब कुटुंबांसाठी एकूण 4.21 कोटी घरे बांधण्यात आली आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेचे दोन प्रकार आहेत. पहिली प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G) आणि दुसरी प्रधानमंत्री आवास योजना शहरी (PMAY-U) आहे. त्याच्या नावावरून स्पष्ट आहे, ते अनुक्रमे ग्रामीण आणि शहरी भागांसाठी कार्य करते.

अन्य लेख

संबंधित लेख