Wednesday, January 15, 2025

लेक लाडकी योजना

Share

महाराष्ट्रातील महिलांना सक्षम करण्याच्या उद्देशाने महिलांना केंद्रस्थानी ठेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक योजना आणल्या आहेत . महिलांची सुरक्षा तसेच त्यांचे सामाजिक आर्थिक स्थान बळकट करण्याच्या उद्देशाने या योजनांची आखणी करण्यात आली आहे. यामुळे राज्य सरकारचे विविध क्षेत्रांत महिला आणि पुरुषांना एकसमान अधिकार मिळावेत आणि राज्यातील स्त्रीशक्तीचे कल्याण व्हावे यासाठीची वचनबध्दता अधोरेखित होते. यामध्ये आरोग्य,शिक्षण, रोजगार आणि सामाजिक सुरक्षा अशा विविध क्षेत्रांचा समावेश आहे.

लेक लाडकी योजना

लेक लाडली योजनेची घोषणा महाराष्ट्राचे अर्थमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या 2023-2024 च्या अर्थसंकल्पीय भाषणात केली होती. मुलींना सक्षम करणे आणि त्यांचे मूलभूत शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा ‘लेक लाडकी योजना’ सुरू करण्यामागील मुख्य उद्देश आहे. महाराष्ट्र सरकार राज्यातील पात्र लाभार्थी मुंलींना 5 वेगवेगळ्या टप्प्यांवर 1,01,000/- इतकी मदत देणार आहे.

महाराष्ट्र लेक लाडकी योजनेंतर्गत राज्यातील मुलींना खालील आर्थिक सहाय्य दिले जाईल:

  • रु. 5,000/- :- जन्माच्या वेळी.
  • रु. 6,000/- :- जेव्हा मुलगी इयत्ता 1ली मध्ये प्रवेश घेते.
  • रु. 7,000/- :- जेव्हा मुलगी सहाव्या वर्गात प्रवेश घेते.
  • रु. 8,000/- :- जेव्हा मुलगी 11वी मध्ये प्रवेश घेते.
  • रु. 75,000/- :- मुलगी 18 वर्षांची झाल्यावर.

योजनेचे पात्रता निकष

१.अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
२.लाडकी योजनेसाठी राज्यातील फक्त मुलीच पात्र असतील.
३.कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
४.राज्यातील पिवळे आणि केशरी शिधापत्रिका असलेल्या मुलींचीच कुटुंबे या योजनेसाठी पात्र असतील.
५.1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींना योजनेचा लाभ मिळेल.

लेक लाडकी योजनेचे आवश्यक कागदपत्रे

१.पिवळा किंवा केशरी रंगाचे शिधापत्रिका
२.मुलीच्या पालकांचे आधार कार्ड
३.आई-वडिलांसोबत मुलीचा फोटो
४.अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
५.पत्त्याचा पुरावा
६.उत्पन्नाचे प्रमाणपत्र
७.मोबाईल नंबर
८.ईमेल आयडी
९.बँक पासबुक

अन्य लेख

संबंधित लेख