मुंबई : निवडणूकीनंतर संख्याबळानुसार मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवला जाईल, अशी भूमिका शरद पवारांनी (Sharad Pawar) घेतली आहे. यावरून आता भाजपा आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane) उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ““शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) लायकी दाखवली. उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपदाच दुकान कायमस्वरुपी बंद झालय. उद्धव ठाकरेंनी दिल्लीला जाऊन मुजरा केला, त्याचा काहीही उपयोग झाला नाही” अशी खोचक टीका नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे वर केली.
नितेश राणे म्हणाले की, “शरद पवारांनी उद्धव ठाकरेंची लायकी दाखवून दिली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदासाठी आता फक्त मुजरा करून यायचे बाकी राहिलेत. बाकी सगळं करून ते आलेत. आतासुद्धा शरद पवारांसारख्या जेष्ठ नेत्यानेच जर अशी भूमिका घेतली असेल तर मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंचं दुकान कायमचं बंद झालेलं आहे,” अशी टीका त्यांनी केली.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण
- ब्रिटनमधील पोस्ट ऑफिस घोटाळा: सरकारी यंत्रणा आणि प्रशासनाचे गौडबंगाल
- ‘सगळे उघडे, नागडे झाले’; बेस्ट निवडणूक निकालावरून आशिष शेलार यांची विरोधकांवर टीका
- उद्धव आणि राज ठाकरेंची युती ठरली अपयशी; बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे युतीचा दारुण पराभव
- नांदेड : पूरग्रस्तांना शासनाकडून सर्वतोपरी मदत, तात्काळ पंचनाम्याचे मंत्री गिरीश महाजन यांचे आदेश