जम्मू काश्मीर विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाने ४०
स्टार प्रचारकांची घोषणा केली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री
राजनाथ सिंह, पक्षाध्यक्ष जगत प्रकाश नड्डा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा
समावेश आहे. पक्षाच्या स्टार प्रचारकांमध्ये ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मनोहर लाल, जी.
किशन रेड्डी, जितेंद्र सिंह आणि शिवराज सिंह चौहान यांचाही समावेश आहे.
जम्मू-काश्मीरच्या 90 सदस्यीय विधानसभेसाठी तीन टप्प्यात निवडणुका होत आहेत. पहिल्या
टप्प्यासाठी १८ सप्टेंबरला, दुसऱ्या टप्प्यासाठी २५ सप्टेंबरला आणि तिसऱ्या टप्प्यासाठी १ ऑक्टोबरला
मतदान होणार आहे. 8 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.