पॅरालिम्पिक मध्ये पुरुषांच्या गोळाफेकीत होकातो होतोझे सेमा याने कांस्य पदक जिंकल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्याचं अभिनंदन केलं आहे. राष्ट्रपतींनी सेमा याच्या कामगिरीचं समाजमाध्यमाद्वारे कौतुक केलं. एका भुसुरुंग स्फोटातून बचावलेल्या सेमा यानं आपल्या पॅरालिम्पिक स्पर्धेतल्या आपल्या पदार्पणातच पदक जिंकल्याचा राष्ट्रपतींनी आवर्जून उल्लेख केला. तसंच त्याच्या उज्ज्व भविष्याबद्दल शुभेच्छा दिल्या. तर हा देशासाठी अभिमानास्पद क्षण असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले.
दरम्यान, पॅरीस पॅरालिम्पिकमध्ये भारतानं आतापर्यंत २७ पदकं जिंकली आहेत. यात ६ सुवर्ण, ९ रौप्य आणि १२ कांस्य पदकांचा समावेश आहे. भारताच्या पॅरालिम्पिकच्या इतिहासातली ही सर्वोत्तम कामगिरी आहे. आतापर्यंत उंच उडीमध्ये प्रवीण कुमार, नेमबाजीत अवनी लखेरा, भालाफेकीत सुमित अंतिल, तिरंदाज हरविंदर सिंग, बॅडमिंटनपटू नितेश कुमार आणि क्लब थ्रोवर धरमबीर नईन यांनी पदकावर आपलं नाव कोरलं आहे. सुवर्ण पदक विजेते तिरंदाज हरविंदर सिंग आणि धावपटू प्रीती पाल यांनी या एकाच पॅरालिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. या दोघी रविवारी होणाऱ्या समारोप समारोहात ध्वजवहन करणार आहेत.