Saturday, December 21, 2024

फडणविसांनी केल्या बार असोसिएशनच्या मागण्या मान्य.महाराष्ट्रातील ‘या’ न्यायालयांमधे बांधल्या जाणार नव्या इमारती…

Share

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच विधी व न्याय खात्याचे मंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वसामान्य नागरिकांची सोय लक्षात घेऊन तसेच स्थानिक बार असोसिएशनचे पदाधिकारी यांनी केलेल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या न्यायालयांच्या नवीन इमारती बांधण्यास प्रशासकीय मान्यता दिल्याचे समजते. या निर्णयामुळे सर्व ठिकाणच्या बार असोसिएशनचे पदाधिकारी यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे असे समजते.

कुठे कुठे बांधल्या जाणार नव्या इमारती?

  1. महाड ( जिल्हा रायगड)- न्यायालयासाठी नवीन ईमारत
  2. पनवेल (जिल्हा रायगड) येथील न्यायालयीन इमारतीवर अतिरिक्त दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर बांधकामास मान्यता
  3. मंगरूळ (जिल्हा वाशिम) – न्यायालयासाठी नवीन ईमारत
  4. अक्कलकोट (जिल्हा सोलापुर) – न्यायालयासाठी नवीन ईमारत
  5. वडुज (जिल्हा सातारा)- न्यायालयासाठी नवीन ईमारत
  6. दहिवडी (जिल्हा सातारा) – न्यायालयासाठी नवीन ईमारत
  7. आमगाव (जिल्हा गोंदिया)- येथील न्यायालयीन ईमारतीकरीता फर्निचरसाठी मान्यता.

वरील सर्व ठिकाणच्या बार असोसिएशनचे पदाधिकारी यांनी फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

अन्य लेख

संबंधित लेख