Thursday, September 19, 2024

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेसंदर्भातील वाद मिटवण्याच्या दृष्टीने अधिक वेगाने प्रयत्न करण्याबाबत भारत आणि चीनमध्येसहमती

Share

भारत आणि चीन दरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण सीमेसंदर्भातील वाद मिट वण्याच्या दृष्टीने जास्त वेगाने प्रयत्न
करण्याबाबत सहमती झाली. रशियातील सेंट पिटर्सबर्ग इथ सुरू असलेल्या ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बैठकीच्या पार्श्वभूमीवर, काल भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे केंद्रीय परराष्ट्र आयोगाचे सचिव वांग इ यांच्यात याबाबत एक स्वतंत्र बैठक झाली. यावेळी भारत चीन दरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आणि सीमेबाबत तयार करण्यात कराराच्या अटींच पालन करण अत्यावश्यक असून, यामुळे दोन्ही देशांचे द्विपक्षीय संबंध सुधारण्यास तसच या क्षेत्रात शांती राखण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल अस मत यावेळी दोन्ही नेत्यांनी व्यक्त केल.

अन्य लेख

संबंधित लेख