Sunday, December 22, 2024

दीनदयालजी उपाध्याय जयंती: धर्म आणि रिलीजन यातील फरक

Share

“रिलीजन ही पाश्चात्य संकल्पना आहे; भारतीय संकल्पना हिंदू रिलीजन किंवा कोणताही ‘इझम’ नाही – हा सनातन धर्म आहे, विश्वाचा शाश्वत नियम आहे, जो कोणत्याही कठोर आणि अंतिम तत्त्वांमध्ये गणला जाऊ शकत नाही. – मिशेल डॅनिनो

पश्चिमेकडे, हिंदू पुरुषार्थाची संपूर्ण माहिती असणे कठीण आहे, मुख्यत: धर्म या शब्दाचा आणि वेद उपनिषद यांचा संस्कृतमधून पाश्चात्य भाषांमध्ये खरा अनुवाद न केल्यामुळे गोंधळ वाढला आहे. त्यामुळे पाश्चात्य जगात धर्माच्या अर्थाचा अपभ्रंश झाला आहे. जीवन जगण्याचा एक मार्ग, प्रत्येक व्यक्तीने पार पाडल्या जाणाऱ्या कर्तव्यांचा संच मानण्याऐवजी, बहुतेकदा तो एक रिलीजन म्हणून समजला जातो. यामुळे अनेक समस्या निर्माण होतात, विशेषत: देशावर किंवा राज्यावर धर्म (धर्मराज्य) आधारित शासन असावे असा विचार करताना गोंधळ उडतो. अशा राज्यावर धर्मशास्त्रीय पद्धतीने राज्य केले जात नाही, कारण रिलीजन हा धर्माच्या समतुल्य नाही. म्हणून, भारत अजूनही ‘धर्मनिरपेक्ष राज्य’ मानला जाऊ शकतो आणि सोबतच एक धर्म आधारित राष्ट्र सुद्धा असू शकतो.

दीनदयाळजी विविध शब्दांचे अंतर्निहित अर्थ स्पष्ट करतात जे समाज राखण्यासाठी सर्वोत्तम मार्गांचा आधार बनतात:
“धर्म राज्य हे राष्ट्राचे रक्षण करण्यासाठी आणि राष्ट्राच्या आदर्शांना साकार करता येईल अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी आणि राखण्यासाठी निर्माण केले जाते. राष्ट्राचे आदर्श हे चिती तयार करतात, जे व्यक्तीच्या आत्म्यासारखे असते. चिती समजून घेण्यासाठी काही प्रयत्न करावे लागतात. जे नियम एखाद्या राष्ट्राचे चैतन्य प्रकट करण्यास आणि टिकवून ठेवण्यास मदत करतात त्यांना त्या राष्ट्राचा धर्म म्हणतात. म्हणून हा ‘धर्म’ सर्वोच्च आहे.

“धर्म हे राष्ट्राच्या आत्म्याचे भांडार आहे. धर्म नष्ट झाला तर राष्ट्र नष्ट होते. जो धर्माचा त्याग करतो तो राष्ट्राचा द्रोह करतो.”

धर्म आणि रिलीजन
धर्म आणि रिलीजन यात मूलभूत फरक आहे. हा फरक समजून घेण्यात आपल्या अपयशामुळे आपण मानवांनी गेल्या शतकात ज्या अनेक प्रमुख समस्यांना तोंड दिले आहे आणि आजही तोंड देत आहोत. समकालीन भाषेत, रिलीजन, अगदी अयोग्यपणे, धर्म समतुल्य आहे. संघटित रिलीजन अनुयायांना पुस्तक आणि पैगंबर किंवा येशू ख्रिस्ताचे पालन करण्याची मागणी करतो. कोणत्याही श्रद्धेच्या सीमेबाहेरील कोणतीही गोष्ट रिलीजनाच्या विरुद्ध मानली जाते. असे मानले जाते की मोक्ष केवळ पैगंबर किंवा येशू ख्रिस्ताच्या शरीराद्वारे किंवा शब्दांमुळेच प्राप्त होतो. मानवजातीचा इतिहास हा रिलीजनचा अभ्यास करताना धर्मांधांकडून अनेकदा झालेल्या विनाशाची एक भयानक साक्ष आहे. लोकांमध्ये फूट पाडणे आणि धर्मांतर करणे, दडपशाही, असहिष्णुता आणि अधीनता, किंवा चुकीच्या मार्गाला लावून बर्बाद करण्याचे इतिहासात अनेक पुरावे आहेत. संपूर्ण इतिहासात रिलीजन ही सर्वात शक्तिशाली फूट पाडणारी शक्ती आहे.

दीनदयाळजींनी धर्म आणि रिलीजन यातील फरक अशा प्रकारे स्पष्ट केला:
“आम्ही ‘रिलीजन’ हा शब्द धर्माचा समानार्थी शब्द म्हणून वापरतो. युरोपियन जीवनाचा अधिक स्वीकार हे आपल्या शिक्षणाचे उत्कृष्ट वैशिष्ट्य बनले. परिणामी, ‘रिलीजन’ या शब्दाची सर्व वैशिष्ट्ये, विशेषत: पाश्चिमात्य देशांत प्रचलित असल्याप्रमाणे, रिलीजन या संकल्पनेलाही आपोआप श्रेय दिले गेले. पाश्चिमात्य देशात अन्याय आणि अत्याचार होत असल्याने, रिलीजनच्या नावाखाली कडवे संघर्ष आणि लढाया लढल्या गेल्या, या सर्व लढाया धर्माच्या असल्याप्रमाणे वेगवेगळ्या गटात सूचीबद्ध केल्या गेल्या. तथापि, रिलीजनची लढाई आणि धर्मासाठी लढाई या दोन भिन्न गोष्टी आहेत. धर्म ही अतिशय व्यापक संकल्पना आहे. धर्म जीवनाच्या सर्व पैलूंशी संबंधित आहे. त्यातून समाज टिकतो आणि प्रगती करतो. त्याही पुढे जाऊन ते सर्व जग टिकवते. जो टिकतो आणि टिकवतो तोच धर्म.

याउलट, पाश्चात्य सांस्कृतिक परंपरा रिलीजनभोवती बांधल्या गेल्या आहेत. 16 व्या आणि 17व्या शतकात राष्ट्र-राज्याचा उदय हा धर्मनिरपेक्ष राज्य आणि चर्च यांच्यातील रिलिजिएस संघर्षांचा परिणाम होता. आज आपण ज्याला आधुनिक राजकीय शब्दावली मानतो त्यापैकी बरेच काही या अशांत काळात उदयास आले. या शब्दावलीचा बराचसा वापर व्यक्ती, राज्य, चर्च, तसेच त्यांचे परस्पर संबंध यांचे क्षेत्र परिभाषित करण्यासाठी केला गेला. ओळख, वांशिकता आणि स्वायत्तता या संकल्पना चर्च आणि राज्य यांच्यातील वेगळेपणाचे गुण दर्शवतात.

पाश्चिमात्य देशांनी जगाच्या बहुतेक भागावर वर्चस्व गाजवल्यामुळे, आधुनिकता ही पाश्चिमात्य देशांत उगम पावलेल्या या विभाजनवादी संकल्पनांशी जोडली गेली. पाश्चात्य शिक्षणपद्धती आपल्याला पाश्चात्य पद्धतीने विचार करायला भाग पाडते. पण त्याहीपेक्षा, पाश्चात्य प्रभावामुळे आपण आपल्या स्वतःच्या तत्त्वांपासून दूर जात आहोत, ज्याचे पाश्चात्य विचारसरणी म्हणून वर्णन केले जाते. शब्द आणि संकल्पनांचा भारतीय लोकांच्या संदर्भात विचार न करता वापरण्याची सवय आम्हाला लागली आहे. पाश्चिमात्य कल्पना आणि संकल्पनांच्या चौकटीत बसण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यामुळे भारतीय समाजात संघर्ष, अराजकता आणि फूट पडली.

भारतीय दृष्टीकोन
आपली मुख्य चूक, जी आपण आजही करत आहोत, ती म्हणजे आपण धर्म आणि रिलीजन यांच्यात स्पष्ट फरक करू शकत नाही. (सनातन धर्म ) जे वैश्विक आणि अनंत आहे ते कसे विभागले जाऊ शकते आणि मर्यादित कसे केले जाऊ शकते? कोट्यावधी लोकांच्या स्वेच्छेने खूप खोलवर अभ्यास व विचार करून विकसित झालेल्या एखाद्या नैतिक विचारधारेला काही तत्त्वे, मर्यादित विचारधारा किंवा मूल्य प्रणालीचा मर्यादित संच कसा दिला जाऊ शकतो? धर्माने सर्व प्रकारच्या बंधनांचा त्याग केला. दुसरीकडे, पाश्चात्य संस्कृती ही अनेक मर्यादांचे मर्यादित स्वरूप आहे.

‘रिलीजन’ ही संकल्पना मूळची पाश्चात्य आहे. हिंदू किंवा सनातन धर्मात, चार्वाकासारख्या नास्तिक आणि भौतिकवादी विचारसरणी होत्या, सर्व ‘हिंदू किंवा सनातन धर्म’ म्हणून एकत्रित होते. साहजिकच, जर आपण रिलीजनाची अब्राहमिक संकल्पना घेतली, तर नास्तिक धर्म निरर्थक आहे – तुम्ही खरेतर ‘ख्रिश्चन नास्तिक’ किंवा ‘मुस्लिम नास्तिक’ होऊ शकत नाही – नाहीतर शिक्षा व्हायची. हिंदुईजम ही धार्मिक परंपरांच्या विविध पंथासाठी किंवा संप्रदायासाठी एक औपनिवेशक वसाहती संज्ञा आहे जी रिलीजनाच्या संदर्भात एकत्र समजली जाऊ शकत नाही. हिंदू धर्म किंवा सनातन धर्मामध्ये वैयक्तिक धर्मांपेक्षा अधिक व्यापक विश्वासांचा आणि विचारांचा समावेश आहे.

म्हणून रिलीजनचे नव्हे तर धर्माचे पालन करूया.

(संदर्भ: श्री नारायण गुणे आणि पंकज जयस्वाल लिखित “की टू टोटल हॅप्पीनेस” हे पुस्तक)

पंकज जगन्नाथ जयस्वाल

अन्य लेख

संबंधित लेख