Tuesday, December 3, 2024

INDIA: देशाचा परकीय चलन साठा ६९२ अब्ज २९ कोटी डॉलर्स या उच्चांकावर

Share

भारताच्या (INDIA) परकीय चलन गंगाजळीत २ अब्ज ८३ कोटी डॉलर्सने वाढ होऊन तो २० सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात ६९२ अब्ज २९ कोटी डॉलर्स एवढ्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात यात २२ कोटी ३० लाख डॉलर्सची वाढ झाली होती. 

भारताच्या सुवर्ण साठा मूल्यातही ७२ कोटी ६० लाख डॉलर्सने वाढ होऊन तो ६३ अब्ज ६१ कोटी डॉलर्स वर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीतून देशाच्या विशेष आहरण अधिकारातही १२ कोटी १० लाख डॉलर्सने वाढ होऊन तो १८ अब्ज ५४ कोटी डॉलर्सवर पोहोचला आहे.

अन्य लेख

संबंधित लेख