Saturday, April 5, 2025

राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांचं वितरण राज्यपालांच्या हस्ते

Share

शेतकऱ्यांच्या यशोगाथेतूनच समाज, राज्य आणि देश उभा राहतो, त्यांच्याशिवाय देशाला भविष्य नाही, असं प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं आहे. वर्ष २०२० ते २०२२साठीच्या एकंदर ४४८ राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांचं वितरण राज्यपालांच्या हस्ते आज मुंबईत झालं, त्यावेळी ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांना राज्यातल्या शेतकऱ्यांचा पूर्ण पाठिंबा होता, त्यामुळेच ते इतकं महान कार्य करू शकले, असं राज्यपालांनी नमूद केलं. 


या पुरस्कारांच्या रकमेत चौपट वाढ केली असून, या पुरस्कारांमुळे बळीराजाला स्फूर्ती मिळत असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. राज्यभरातून आलेले पुरस्कारार्थी तसंच विविध संबंधित अधिकारी आणि इतर यावेळी उपस्थित होते.

अन्य लेख

संबंधित लेख