Thursday, November 21, 2024

नरेंद्र मोदी पोहरागडावर येणारे देशातील पहिले पंतप्रधान – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Share

वाशिम : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून, त्यांनी सकाळी वाशिम जिल्ह्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे नंगारा वास्तू संग्रहालयाचे उद्घाटन केले. पोहरागड, ज्याला बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखले जाते, तिथे येणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंजारा समाजाशी विशेष नाते आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर पोहरागडावर येणारे ते पहिले पंतप्रधान आहेत. पंतप्रधान मोदींनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो,” असेही फडणवीस म्हणाले.

रामरावबापूंनी आम्हाला येथे विकासकामे आणि बंजारा संग्रहालयाचे जबाबदारी दिली होती, आज ती संधी मिळाल्याचा आम्हाला आनंद आहे. यामुळे रामरावबापूंचा आशीर्वाद मिळेल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान योजना सुरू केली, त्याचबरोबर नमो किसान सन्मान योजना आणली. यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात १२ हजार रुपये जमा होत आहेत. पुढील १८ महिन्यांत महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना १८ तास वीज मिळेल, असा आत्मविश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.

अन्य लेख

संबंधित लेख