Wednesday, December 4, 2024

महाविकास आघाडीने शेतकरी योजनांना ठप्प केले – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Share

वाशिम : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज महाराष्ट्र (Maharashtra) दौऱ्यावर आहेत. सकाळी त्यांनी विदर्भातील वाशिम (Washim) जिल्ह्याचा दौरा केला. वाशिम जिल्ह्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे नंगारा वास्तू संग्रहालयाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सकाळी झाले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी अनेक दशकांपर्यंत अनेक संकटांचा सामना केला आहे. महाआघाडीतील सरकारचे दोनच अजेंडे होते. शेतकऱ्यांशी संबंधित योजना ठप्प करायच्या. दुसरा त्या योजनेत भ्रष्टाचार करणे, अशी घणाघाती टीका मोदी यांनी केली.

आम्ही केंदातून पाठवलेला पैसा तुमच्याकडे येत नव्हता. महाविकास आघाडी तो पैसे खाऊन टाकत होती. काँग्रेसने आपल्या शेतकरी बंधू-भगिनींच्या जीवनात नेहमीच अडचणी निर्माण केल्या आहेत, ते पुन्हा तोच जुना खेळ खेळात आहेत. त्यामुळेच त्यांना पीएम-किसान सन्मान निधी योजना आवडत नाही. काँग्रेसने या योजनेचा मजाक उडवला. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पैशाचा विरोध करत आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यातील पैशात त्यांना भ्रष्टाचार करायचा आहे असा आरोप त्यांनी केला.

अन्य लेख

संबंधित लेख