Friday, October 18, 2024

लोकसभेत काँग्रेसने केलेल्या खोटारडेपणाचा जनता बदला घेण्याशिवाय राहणार नाही- चंद्रशेखर बावनकुळे

Share

हरयाणा विधानसभेच्या (Haryana Assembly Election) निवडणुकीत  काँग्रेसचा (Congress) खोटारडेपणा उघडा पडला, अशी प्रतिक्रीया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांनी दिली आहे.  देशात २०२९पर्यंत भाजपाचं सरकार असल्याने आता राज्यालाही डबल इंजिन सरकारची गरज असल्याचं हरयाणाच्या आणि जम्मू काश्मीरच्या जनतेला कळून चुकलं आहे. असं ते म्हणाले. महाराष्ट्रातही महायुतीला भरघोस मतं मिळतील आणि डबल इंजिन सरकार येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

जनता विकसित भारतासह विकसित राज्यासाठी त्यांना साथ देत आहे. हेच या जनमतातून दिसून येत असल्याची प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी बोलताना व्यक्त केली आहे.

काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७० हटविल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक होती. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकांचे निकाल आता स्पष्ट झाले असून ओमर अब्दुल्ला मुख्यमंत्री होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

 १० वर्षांनंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. नॅशनल कॉन्फरन्स (एनसी) सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. नॅशनल कॉन्फरन्स व काँग्रेस यांच्या आघाडीने बहुमाताचा आकडा पार केला आहे.

अन्य लेख

संबंधित लेख