Monday, April 20, 2026

धर्मांतर आणि देहव्यापार रॅकेट; कट्टरपंथी अमरीन-आफरीन बहिणींच्या टोळीचा तपास तीव्र

Share

मुंबई/भोपाळ : कथित धर्मांतर, लैंगिक अत्याचार आणि देहव्यापार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अमरीन आणि आफरीन या दोन कट्टरपंथी बहिणींच्या तपासातून दररोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. या दोघींचे कुटुंब भोपाळमधील कुख्यात ‘इराणी छावणी’शी (इराणी डेरा) जोडलेले असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, पोलिसांनी आता या गुन्हेगारी कोनातून तपास सुरू केला आहे.

तपासादरम्यान असे दिसून आले आहे की, या बहिणींनी ब्युटी पार्लरच्या नावाखाली आपले नेटवर्क तयार केले होते. याद्वारे गरजू तरुणींना आमिष दाखवून त्यांना जाळ्यात ओढले जात असे. सुरुवातीला बालसंगोपनाच्या कामासाठी मुलींना घरी बोलावले जायचे आणि नंतर त्यांना ड्रग्ज देऊन अत्याचार केले जात असत. या रॅकेटमध्ये आतापर्यंत ५ ते ७ मुली भरडल्या गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

पीडितांनी दिलेल्या एफआयआरनुसार, आरोपी बहिणींनी त्यांना गुजरात आणि मुंबईला नेऊन अनोळखी लोकांशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. इतकेच नव्हे तर, त्यांना एमडी (MD) ड्रग्ज आणि दारू घेण्याची सक्ती केली जात असे. या प्रकरणात चंदन यादव नावाच्या तरुणाने या बहिणींच्या संपर्कात आल्यावर इस्लाम धर्म स्वीकारल्याचेही समोर आले आहे.

या संपूर्ण गुन्ह्यात बिलाल (अमरीन आणि आफरीन चा मावस भाऊ), यासिर आणि चानू उर्फ हाशिम रझा हे साथीदार असल्याचे समोर आले आहे. अतिरिक्त डीसीपी गौतम सोळंकी यांनी सांगितले की, मुख्य आरोपी अमरीन, आफरीन आणि चंदन यादव उर्फ प्रिन्स सध्या तुरुंगात आहेत. मात्र, आफरीनने पोलिसांना मोबाईल फोनबाबत खोटी माहिती देऊन दिशाभूल केली आहे. फरार आरोपींच्या अटकेसाठी दोन स्वतंत्र पोलीस पथके मुंबई आणि गुजरातमध्ये छापे टाकत आहेत.

नोकरीचे आमिष दाखवून ‘स्पा सेंटर’च्या नावाने मुलींना देहव्यापारात ढकलणाऱ्या या टोळीचा ‘सिव्हिलायझेशनल’ आणि गुन्हेगारी वारसा तपासण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांपुढे आहे.

अन्य लेख

संबंधित लेख