सामान्य माणसांना आरोग्य (Health facility) सुविधा चांगल्या पध्दतीने उपलब्ध व्हावी या उद्देशाने वैद्यकीय क्षेत्रात विविध स्तरावर प्रयत्न होत आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत(Mahatma Jyotiba Phule Jan Aarogya Yojana) मिळणारं आरोग्य कवच आता प्रति कुटुंब प्रति वर्ष दीड लाख रुपयांवरून ५ लाख रुपयांपर्यंत वाढलं आहे असं केंद्रीय आयुष आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली. त्यांच्या अध्यक्षतेखाली ‘आयुष्मान संवाद’ हा आयुष्मान भारत योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठीचा कार्यक्रम नुकताच बुलढाण्यात झाला, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात दोन कोटी ८५ लाख लाभार्थींनी आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेतला. तर बुलढाणा जिल्ह्यात ७ लाख २३ हजार आयुष्मान कार्ड वितरित झाली अशी माहिती यावेळी सादरीकरणातून देण्यात आली.