मुंबई – प्रसिद्ध उद्योगपती रतन नवल टाटा यांचं काल रात्री मुंबईमध्ये निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. गेले काही दिवस ते उपचारांसाठी ब्रीच कॅंडी रूग्णालयात अॅडमिट होते. १९९१ पासून त्यांनी टाटा समूहाचं अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती.
सकाळी १०.३० पासून त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी एन.सी.पी.ए मध्ये ठेवण्यात येणार आहे. दुपारी ३.३० वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
देशातील प्रसिध्द व्यवसाय समूह असलेल्या टाटा समूहाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. टाटा समूहाची स्थापना जमशेदजी टाटा यांनी केली होती. त्यांच्या कुटुंबातील अनेक पिढ्यांनी या समूहाचा विस्तार केला.