Thursday, January 2, 2025

रतन टाटा यांना ‘भारत रत्न’ देण्याची मागणी करणारा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर.

Share

प्रसिद्ध उद्योगपती रतन नवल टाटा यांचं काल रात्री मुंबईमध्ये निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. १९९१ पासून त्यांनी टाटा समूहाचं अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती.त्यांचे भारताच्या प्रगती मध्ये आणि भारताच्या विकासामध्ये मोलाचे योगदान आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान करत महायुती सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत रतन टाटा यांना ‘भारत रत्न’ देण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. हा ऐतिहासिक निर्णय रतन टाटा यांच्या अप्रतिम वाटचालीने आणि उद्योग जगतातील मोठ्या योगदानाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे आणि केंद्र सरकारला ही विनंती करण्याचा निर्णय घेतला आहे.

आजच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोकप्रस्ताव मांडताना रतन टाटा यांच्या जीवनाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला आणि त्यांच्या अनन्यसाधारण कार्यासाठी श्रद्धांजली अर्पण केली.

अन्य लेख

संबंधित लेख