Friday, November 22, 2024

“खोटं बोलून पळ काढू नका!” – शेलारांचे आदित्य ठाकरेंना खुले आव्हान

Share

मुंबई : भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ट्विटरद्वारे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “आम्ही खुल्या चर्चेला तयार आहोत, तुम्ही या,” असे आव्हान शेलार यांनी ठाकरेंना दिले आहे. दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार असून, २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होईल.

धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या संदर्भात आदित्य ठाकरे यांनी भाजपवर गंभीर आरोप केले होते, ज्यात त्यांनी धारावीत 300 एकर पुनर्विकासाच टेंडर अदानीला दिलंय. मुंबईतील तुमची आमची जमीन अदानीला फुकटात दिलीय. कुर्ला, मढ, देवनार येथील जमिन अदानींना दिलीय. मुंबईतील एकूण 1080 एकर जमीन फुकटात अदानींच्या घशात घातलीय, अआरोप त्यांनी केला होता.या आरोपावर आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर देत, १०८० एकर आकडा कुठून आला, असा सवाल केला आहे.

आशीष शेलार यांनी आपल्या ट्वीटमध्ये आदित्य ठाकरेंना “बुद्धिमान खोटारडे” म्हणत, प्रश्नांची उत्तरे देण्याचे आव्हान केले आहे. त्यांच्या ट्वीटमध्ये आशिष शेलार यांनी विचारले:

आशिष शेलार यांचं ट्विट

बुद्धिमान खोटारडे आदित्य ठाकरे आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या.. खोटं बोलून पळ काढू नका !

◆1080 एकर आकडा आला कुठून ?

◆अदानीच्‍या नावावर 1080 एकर जागा चढली, सरकारने दिली याबाबत शासकीय कागद, कॅबिनेट निर्णय दाखवा…

◆उलट धारावीतील नेचर पार्क 37 एकरचा भूखंड हडप करण्याचा डाव आहे की नाही ?

◆उत्तर द्या ! आम्ही खुल्या चर्चेला तयार आहोत.. तुम्ही या !!

◆नाहीतर पेग्विनची काळजी करीत राणीच्या बागेत बसा !

आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंना चर्चेसाठी खुले आव्हान देत, “उत्तर द्या, खोटं बोलून पळ काढू नका. नाहीतर पेग्विनची काळजी करीत राणीच्या बागेत बसा,” अशी उपरोधिक टीका केली आहे. विधानसभा निवडणुका जाहीर होताच नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असल्याचे चित्र आहे.

अन्य लेख

संबंधित लेख