Sunday, November 24, 2024

उबाठा गटाचे नेते अरविंद सावंतां विरोधात गुन्हा दाखल

Share

शिवसेना नेत्या शायना एनसी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हे प्रकरण राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलं आहे, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विषयावर तीव्र असंतोष व्यक्त केला आहे.

अरविंद सावंत यांनी एका वृत्तवाहिनीवर बोलताना शायना एनसींबद्दल “माल” असा उल्लेख केला होता, ज्यावरून शायना एनसी यांनी आरोप केले की, त्यांना अपमानित करण्यात आलं आहे. या आरोपांनंतर, नागपाडा पोलीस ठाण्यात अरविंद सावंत यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणावरून असंतोष व्यक्त करताना म्हटले, “जर बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी केलेल्या वक्तव्याचा अरविंद सावंतांना थोबाड फोडला असता.” शिंदे यांनी हेही स्पष्ट केले की, अशा प्रकारच्या वक्तव्यांना जनता कधीही माफ करणार नाही.तर मुख्यमंत्री आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातून त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

या घटनेमुळे उबाठा गटाला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये फटका बसण्याची शक्यता आहे.

अन्य लेख

संबंधित लेख