Thursday, November 14, 2024

चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला

Share

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. बावनकुळे यांनी ठाकरेंच्या कार्यक्रमांची शैली आणि त्यांच्या कारभाराच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

“उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे घरात बसून फेसबुकवर लाईव्ह येऊन राज्याचा कारभार चालवला. आताही त्यांची ही सवय सुटली नाही. ‘मातोश्री’वरून त्यांनी आपल्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे, हे दाखवते की त्यांची घरात बसून कारभार करण्याची सवय अजूनही कायम आहे,” असं बावनकुळे यांनी X वरील एका पोस्टमध्ये म्हटलं आहे.

https://twitter.com/cbawankule/status/1854399265352589402

त्यांच्या म्हणण्यानुसार, ठाकरे यांनी आपल्या कुटुंबाच्या पलीकडे जाऊन लोकांच्या दारात जाऊन काम करण्यापेक्षा घरातूनच राजकारण करण्याची पद्धत निवडली आहे. बावनकुळे म्हणाले, “उद्धवजी नेता घरात नाही, तर लोकांच्या दारात शोभून दिसतो!ही टीका राजकीय वातावरणात चर्चेचा विषय ठरली असून, निवडणूक प्रचाराच्या या काळात उभय पक्षांमधील शाब्दिक युद्ध अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. बावनकुळे यांच्या या विधानानंतर शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

अन्य लेख

संबंधित लेख