महाराष्ट्र : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Elections) महायुतीने आपले प्रतिस्पर्धी पक्षावर मोठ्या फरकाने विजय मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारतीय जनता पक्षाने (BJP) या निवडणुकीत अभूतपूर्व यश संपादन करत 100 पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली आहे, ज्यामुळे राज्यातील भाजपाचे नेतृत्व अधिक मजबूत झाले आहे.
महायुतीच्या अभूतपूर्व यशानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पहिली प्रतिक्रिया देत महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले. आपल्या ट्विटमध्ये फडणवीस म्हणाले, “एक है तो ‘सेफ’ है ! मोदी है तो मुमकिन हैं !” हे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील विकासाच्या प्रयत्नांना आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या प्रचंड पाठिंब्याला अभिवादन करणारे आहे.
महायुतीने सध्या 220 जागांच्या जवळपास विजय मिळवत शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार्याने मोठा विजय साजरा केला आहे. हा विजय भाजपासाठी राज्यातील राजकीय वर्चस्व मजबूत करणारा आहे, तर विरोधी पक्ष महाविकास आघाडीसाठी हा पराभव संघटनात्मक ताकद वाढवण्याचा आणि आगामी रणनीतीवर पुनर्विचार करण्याचा संदेश देतो.