Tuesday, November 26, 2024

पोलीस महासंचालक पदी रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती

Share

महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदी रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती झाली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार शुक्ला यांच्या जागी संजयकुमार वर्मा यांची नेमणूक झाली होती. आणि शुक्ला यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं. शुक्ला यांना पदावरुन हटवण्याची मागणी काँग्रेसने केली होती. आता निवडणूक प्रक्रीया संपल्यानंतर शुक्ला यांना पुन्हा नियुक्त करण्याचा आदेश गृहमंत्रालयानं काल काढला आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरु असतानाच राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाने तीन आठवड्यांपूर्वी रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरुन बदली केली होती. यानंतर राज्याच्या पोलीस महासंचालकपदी वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय वर्मा यांची नियुक्ती केली होती.

रश्मी शुक्लांवर आरोप काय होते?
रश्मी शुक्ला यांच्यावर विरोधकांचे फोन टॅप केल्याचा आरोप आहे. या प्रकरणामुळे त्या वारंवार वादात अडकल्या होत्या. याआधी, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा फोन टॅप केल्या प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या चर्चेत आल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी रश्मी शुक्ला अवैध पद्धतीने फोन टॅपिंग करत असल्याचा आरोप केला होता.

अन्य लेख

संबंधित लेख