Wednesday, February 5, 2025

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार का? रामदास आठवले यांचे स्पष्ट मत

Share

मुंबई : आजपासून महाराष्ट्रात ‘देवेंद्र पर्वा’ला सुरुवात होणार आहे, ज्यात भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून ते शपथ घेतील. यासोबतच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ (Oath) घेणार आहेत. तथापि, शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्रीपदाची (Deputy Chief Minister) शपथ घेणार का, याबाबत अजूनही उलटसुलट चर्चा सुरू आहे. यावर महायुतीतील केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी काही महत्त्वाच्या भविष्यवाण्या केल्या आहेत.

रामदास आठवले यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, “मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोललो असून, शिंदेंना योग्य सन्मान मिळायला हवा. शाह यांना सांगितले आहे की, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतील,” असं ते म्हणाले.

यावेळी त्यांनी संजय राऊत यांनाही टोला लगावला आणि उद्धव ठाकरे यांच्या काँग्रेससोबत जाण्याच्या निर्णयावर टीका केली. “आमचे आंतरराष्ट्रीय संबंध आहेत. त्यामुळे आम्ही परदेशातील लोकांना सुद्धा बोलवू. त्यामुळे संजय राऊत यांनी टीका करण्यापेक्षा त्यांच्या नेत्यांना सुद्धा उद्यासाठी बोलावलं आहे. उद्धव ठाकरे आमच्यासोबत असते, तर त्यांचा मान-सन्मान आणखी वाढला असता. त्यांनी काँग्रेससोबत जाऊन मोठी चूक केली”, असे रामदास आठवले म्हणाले.

अन्य लेख

संबंधित लेख