Join our community of SUBSCRIBERS and be part of the conversation.

To subscribe, simply enter your email address on our website or click the subscribe button below. Don't worry, we respect your privacy and won't spam your inbox. Your information is safe with us.

32,111FollowersFollow
32,214FollowersFollow
11,243FollowersFollow

News

Company:

Wednesday, May 14, 2025

दाऊदच्या हस्तकांचा मुद्दा उपस्थित करत विनोद तावडे यांचा शरद पवारांना जोरदार प्रत्युत्तर

Share

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल पत्रकार परिषदेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर तीव्र टीका केली. शिर्डीतील भाजप अधिवेशनात अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर हल्ला केला होता, त्याला शरद पवार यांनी उत्तर दिलं. पवार यांनी इतिहासाची पान पलटून, जुनी गोष्टी बाहेर काढत अमित शाह यांच्यावर व्यक्तिशः हल्ला केला. त्यांनी अमित शाह यांच्या तडीपार होण्याच्या संदर्भातील पुरावे उचलले आणि सांगितले, हे गृहस्थ गुजरातमध्ये राहू शकत नव्हते, अन् त्याला मुंबईत आसरा देण्यात आला होता. तेव्हा बाळासाहेबांच्या घरी जाऊन सहकार्य करावं अशी विनंती त्यांनी केली होती. याची माहिती माझ्यापेक्षा उद्धव ठाकरे सांगतील” असं पवार म्हणाले होते. आता या आरोपांना भाजपचे (BJP) राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी प्रत्युत्तर दिलं.

“दाऊदच्या हस्तकांना आपल्या हेलिकॉप्टर मधून प्रवास करविणाऱ्या मुख्यमंत्र्यांपेक्षा सोहराबुद्दीन सारखा लष्कर-ए-तोयबाचा हस्तक व इस्लामी दहशतवादी याच्या एन्काऊंटरमध्ये तडीपार होणे हे देशभक्तीचे लक्षण मानले जाईल. अमित शहांची तडीपारी दरोडा-चोरीसाठी नव्हती! दाऊद हस्तकांना संरक्षण हे छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू-फुले-आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला शोभणारं नाही, हे बहुदा मा. पवार साहेब विसरले आहेत” असं प्रत्युत्तर विनोद तावडे यांनी दिल.

“दोन जन्मठेपांची – काळ्या पाण्याची शिक्षा झालेले स्वातंत्र्यवीर सावरकर मंत्री झाले असते तर त्यांच्याबाबतही पवार साहेबांनी हेच वक्तव्य केले असते का?. श्रद्धेय अटल जी, अडवाणी जी आणि अनेक मान्यवर नेते आणीबाणीच्या काळात 17 महिने तुरुंगात होते, ते नंतरच्या काळात मंत्री व पंतप्रधान झाले, त्यांच्याविषयी देखील हेच म्हटले असते का? हे पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या जनतेला नक्की सांगितले पाहिजे” असं विनोद तावडे यांनी म्हटलं आहे.

अन्य लेख

संबंधित लेख