Thursday, November 6, 2025

भारतीय भाभा अणुऊर्जा प्रकल्पात शास्त्रज्ञ आणि जिहादी गुप्तहेराची घुसखोरी

Share

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने इतक्यातच इराण आणि पाकिस्तानसाठी काम करणाऱ्या दोन गुप्तहेरांना अटक केली आहे. त्यापैकी ६० वर्षीय अख्तर हुसैन कुतुबुद्दीन अहमद याला मुंबईतील वर्सोवा परिसरातून पकडले गेले. तो भाभा अणु संशोधन केंद्र (बार्क) मधील शास्त्रज्ञ असल्याचे नाटक करून परदेशात मुक्त संचार करत होता. त्याच्यावर संवेदनशील माहिती विकल्याचा आरोप आहे. त्याचा एक सहकारी झारखंडमधून अटक झाला असून, दोघांना सध्या पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

युरोप आणि अमेरिकेत असे फसवे गुप्तहेर झटक्यात कायद्याच्या जाळ्यात अडकतात आणि त्यांना कठोर शिक्षा होते. पण भारतात अजूनही १९२३ चा शासकीय गुपिते कायदा (Official Secrets Act) लागू आहे. हा कायदा आता कालबाह्य झाला आहे. परकीय गुप्तहेरी आणि मक्कारी रोखण्यासाठी या कायद्यात मूलगामी बदल करणे हे भारताच्या सार्वभौमत्व आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक झाले आहे.

भारताच्या सुरक्षेसाठी महत्त्वाच्या संस्थांमध्ये घुसून संवेदनशील माहिती शत्रू देशांना पुरवण्याचा प्रयत्न अनेक जिहादी गट करत आहेत. त्यासाठी गरीब किंवा अर्धशिक्षित नव्हे, तर उच्चशिक्षित, कावेबाज आणि जिहादी मानसिकतेचे गट  मुस्लिम तरुणांना फसवतात. त्यांना आतंकवादी बनण्यास प्रवृत्त करतात. २०१६ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, ISIS शी जोडलेल्या गुन्ह्यांत सापडलेल्या १५२ भारतीय मुस्लिमांपैकी ७० टक्के आतंकवादी मध्यमवर्गीय आणि उच्चशिक्षित होते त्यापैकी ५० टक्के पदवीधर आणि २३ टक्के पदव्युत्तर होते. आधुनिक जिहादी दहशतवादात सुशिक्षित तरुणांचा वाढता सहभाग हा चिंताजनक ट्रेंड आहे. पूर्वी दहशतवादी हे गरीब किंवा अल्पशिक्षित असतात असे मानले जात असे. पण आता इंजिनीअरिंग, वैद्यकीय, आयटी आणि व्यवस्थापन क्षेत्रातील तरुण मोठ्या प्रमाणात जिहादी गटांत सामील होत आहेत. सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्स हे त्यांना कट्टरतेकडे आकर्षित करण्याचे मुख्य साधन बनले आहेत.

अख्तर हुसैनची गुंतागुंतीची पार्श्वभूमी 

अख्तर हुसैनची पूर्व पार्श्वभूमी अत्यंत क्लिष्ट आहे. २००४ मध्ये दुबईतून त्याला हाकलण्यात आले होते, कारण तेव्हाही तो भारताची संरक्षणदृष्ट्या महत्त्वाची माहिती अरब राजदूतांना विकण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हाही त्याने स्वतःला शास्त्रज्ञ म्हणून सादर केले होते. पुढील तपासात त्याला निर्दोष सोडण्यात आले. मात्र, गेल्या २० वर्षांत त्याने ‘अॅलेक्झांडर पाल्मर’ आणि ‘अली रझा हुसैन’ अशा खोट्या ओळखी वापरून जगभर प्रवास केला. बार्कमध्ये शास्त्रज्ञ असल्याचा दावा करून त्याने दुबई, तेहरानसह अनेक देशांना भेटी दिल्या. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, त्याची शैक्षणिक प्रमाणपत्रेही बनावट होती. १०वी, १२वी, बीएससी, बीटेक, एमबीएच्या डिग्री आणि गुणपत्रके अशी कागदपत्रे त्याच्याकडे मिळाली. त्याचबरोबर आधार, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि बार्कचे खोटे ओळखपत्रही त्याने तयार करून घेतले होते. सुरुवातीची अनेक वर्षे तो दिल्लीत राहिला. त्याने काही काळ अरबी तेल कंपन्यांमध्येही काम केल्याचे पुरावे मिळाले आहेत.

पोलिस छाप्यात सापडलेले पुरावे

अख्तरच्या घरातून पोलिसांना अनेक संशयास्पद वस्तू सापडल्या:

  • १४ नकाशे (संवेदनशील ठिकाणांचे)
  • अणु डेटा (न्युक्लिअर माहिती)
  • खोटे पासपोर्ट, आधार, पॅन कार्ड
  • बार्कचे बनावट ओळखपत्र
  • मोबाईल फोन आणि पेन ड्राईव्ह

हे नकाशे आणि डेटा भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाला धोका पोहोचवणारे असल्याची शक्यता आहे. पोलिसांना संशय आहे की, ही माहिती भारतविरोधी परदेशी शक्तींना विकण्याचा प्रयत्न अख्तर करत होता. त्याने नुकतेच केलेले आंतरराष्ट्रीय कॉल्स आणि त्यातील संवादाचा तपास क्राईम इंटेलिजन्स युनिट (CIU) करत आहे. त्याच्या कॉल रेकॉर्डमध्ये परदेशी हँडलर्स किंवा जिहादी नेटवर्कशी संपर्क असल्याची शक्यता आहे.

सहकारी आणि कुटुंबीयांचा सहभाग

अख्तरचा भाऊ अदील हुसैनी आणि सहकारी मुन्नाझील खान (३४ वर्षे, झारखंड) यांच्याशीही संबंध आहे. मुन्नाझील हा सायबर कॅफेचा मालक असून, त्याने अख्तरसाठी खोटी शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि दोन बनावट पासपोर्ट तयार केले. यात अदीलच्या नावाने जमशेदपूरमधील १९९५ मध्ये विकलेली जुन्या मालमत्तेचा पत्ता वापरला गेला. मुन्नाझीलला १ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. अख्तरने सुरुवातीला पोलिसांना फसवण्यासाठी भाऊ मेला असल्याचा खोटा दावा केला होता. दोन्ही भावंडे खोट्या ओळखीने परदेशात गेले असल्याची शक्यता आहे.

मध्यम पूर्वेकडील नोकरी आणि फसवणूक

अख्तरचा मध्यम पूर्वेतील कंपन्यांमध्ये नोकरीचा इतिहास आहे. तो बार्कशी संबंधित असल्याचा दावा करून अनेकांना फसवत होता. ही घटना भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे करते. मुंबई क्राईम ब्रँच आणि CIU मोठ्या गुन्हेगारी नेटवर्कचा शोध घेत आहेत. अख्तरला १२ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले असून, तपास सुरू आहे.

पाकिस्तानातील सुशिक्षित जिहादींचा ट्रेंड

पाकिस्तानमध्ये राष्ट्रीय काउंटर टेररिझम अथॉरिटी (नॅक्टा) च्या अभ्यासानुसार, शहरी विद्यापीठांमध्ये जिहादी गट तयार होत आहेत. कराची विद्यापीठ, पंजाब विद्यापीठ, आंतरराष्ट्रीय इस्लामी विद्यापीठ (IIU) आणि इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (IBA) मध्ये अल-कायदा आणि ISIS चे सेल्स सापडले आहेत. IBA चा पदवीधर साद अझीझ याने २०१५ मध्ये इस्लामाबादमध्ये ISIS-प्रेरित हल्ला केला. हे तरुण आयटी स्किल्समुळे प्रचार आणि फंडरेजिंगमध्ये उपयुक्त ठरतात.

जिहादी मानसिकतेची चौकट

सुशिक्षित दहशतवादी ‘डिस्गस्ट’, ‘कॉग्निटिव्ह क्लोजर’, ‘इन-ग्रुप आउट-ग्रुप’ आणि ‘सिम्प्लिझम’ या चौकटीत ब्रेनवॉश केले जातात. ते आधुनिकता, सूफी इस्लाम आणि अल्पसंख्याक हक्कांचा विरोध करतात. ‘तकफीर’ (अपवित्र ठरवणे) वापरून मुस्लिम समाज शुद्ध करण्याचा प्रयत्न करतात. साम, दाम, दंड, भेद वापरून कट्टरतावादी युवकांची फौज तयार केली जाते.

जिहादी गट ‘गझवा-ए-हिंद’, ‘खिलाफत’, ‘खोरासानचे काळे ध्वज’ आणि अँटी-अमेरिकनिझम अशी नॅरेटिव्ह सोशल मीडियावर व्हायरल करतात. शहरी आधुनिक संस्थांमध्ये त्यांचे प्रभुत्व वाढत आहे.

जागतिक ट्रेंड आणि भारतातील उदाहरणे

जागतिक स्तरावर ‘इंजिनिअर्स ऑफ जिहाद’ पुस्तकानुसार, इंजिनीअर्स आणि वैज्ञानिक जिहादी गटांत जास्त आहेत, कारण ते तांत्रिक जोखमीची कामे सहज करू शकतात. अमेरिकेतही सुशिक्षित स्थानिक जिहादी हल्ल्यांत सामील होतात. गेमिंग प्लॅटफॉर्म्सवर (उदा. रॉब्लॉक्स) कट्टरतावाद वाढत आहे.

भारतात आजवर अनेक उच्चशिक्षित जिहादी सक्रिय असल्याचे दिसून आले आहे. 

नावशिक्षणकारवाई
याकूब मेमनचार्टर्ड अकाउंटंट (CA)१९९३ मुंबई बॉम्बस्फोट (२५७ मृत्यू); दाऊदशी संबंध; २०१५ फाशी
रियाझ भटकलइंजिनीअरइंडियन मुजाहिद्दीन संस्थापक; २००६ मुंबई ट्रेन, २००८ दिल्ली-अहमदाबाद ब्लास्ट्स
अब्दुल सुब्हान कुरेशीइलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमाIM नेते; बॉम्ब तयार करणे, २००८ ब्लास्ट्स
डॉ. शाहनवाझ आलमMBBS२००५ वाराणसी, २००६ मुंबई ट्रेन ब्लास्ट्स; LeT प्रशिक्षण
सैफुल्लाM.Tech (कॉम्प्युटर सायन्स)ISIS मॉड्यूल प्रमुख; २०१७ हापुड हल्ला
मोहम्मद मंसूर पीरभोयB.Tech (सॉफ्टवेअर)२००८ अहमदाबाद ब्लास्ट्स; ईमेल हॅकिंग
डॉ. जाफर इकबाल श्लापूरMBBS, न्यूरोलॉजी डिप्लोमाहिंदू नेते-पत्रकारांवर हल्ल्याचे षडयंत्र

ही घटना भारताच्या अणुसुरक्षेवर गंभीर प्रश्न उभे करते. भारताच्या सुरक्षेसाठी आधुनिक कायदे, सतर्क गुप्तचर यंत्रणा आणि डिजिटल निरीक्षण यांची नितांत गरज आहे. अन्यथा असे खोटे शास्त्रज्ञ आणि जिहादी गुप्तहेर देशाच्या मुळाशी पोखरतील.

– अमिता आपटे

अन्य लेख

संबंधित लेख