गंगाखेड : आगामी गंगाखेड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत (Gangakhed Municipal Council Election) भारतीय जनता पार्टीने (BJP) जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे. भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार जयश्री रामप्रभु मुंढे (Jayashri Mundhe) यांनी काल (रविवार, १६ नोव्हेंबर २०२५) निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करताना भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या उत्साहात उपस्थित होते. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासोबतच, भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यामुळे गंगाखेड नगरपरिषद निवडणुकीत भाजपचा प्रचार आता अधिकृतपणे सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.