Sunday, July 6, 2025

देशाला पुढे न्यायचे असेल अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श महिलांनी घेण्याची गरज…डॉ वृंदा शिवदे

Share

पांचपाळी हौद दुर्गा माता मंदिर मंडळ तर्फे नवरात्र उत्सवामध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित “अहिल्यादेवी जीवन चरित्र ” या विषयावर डॉ वृंदा शिवदे यांचे व्याख्यान झाले.
अहिल्यादेवी यांचे चारीत्र्याबद्दल सांगत असताना त्यांच्या जीवनात घडलेल्या अनेक प्रकारच्या प्रेरक प्रसंगांचे वर्णन त्यांनी आपल्या बोलण्यात केले.

“अगदी लहान वयात त्यांचे लग्न पेशव्यांच्या मध्यस्तीने मल्हारराव होळकर यांच्या मुलासह त्यांचा विवाह झाला व लवकरच त्यांनी राज्यकारभार आपल्या हाती घेतला….राज्यकारभार बघत असताना त्यांनी आपल्या पतीला ही खर्च केलेल्या पैशाचा हिशोब मागितला होता व त्याची शिक्षा ही सुनावली होती.. या प्रसंगातून त्यांची कणखर न्याय बुद्धी ,राज्यातील प्रत्येकाला एकच न्याय हे गुण दिसतात.

पुढे बोलताना त्यांनी अहिल्यादेवींनी केलेल्या महेश्वर येथील अनेक घाट ,मंदिरे , लोकोपयोगी कामांची माहिती दिली … छ.शिवाजी महाराजांनी ज्या प्रमाणे इथे राज्यकारभार केला अगदी तसाच राज्यकारभार एक महिला असूनही त्यांनी केला …विधवांसाठी दत्तक पुत्र घेण्याचा अधिकार त्यांनी दिला, सती प्रथा बंदीचा कायदा त्यांनी केला अशा अनेक चांगल्या गोष्टींची अंमलबजावणी त्यांनी राज्यकारभार चालवताना केली.

आजच्या काळात सुद्धा महिला अनेक क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आपण बघतो तरीसुद्धा अजूनही अनेक महिला या स्वतःच्या स्वतः निर्णय घेणे किंवा स्वतःचे मत व्यक्त करणे अशा विषयांमध्ये मागे असल्याचे दिसत आहे, स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे राहत असताना महिलांनी स्वतंत्रपणे आपापल्या घरी किंवा कामाच्या ठिकाणी निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होणे आवश्यक आहे. या संदर्भातील उदाहरण स्पष्ट करत असताना त्यांनी आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा महिलांनी शंभर टक्के मतदानाचा आग्रह धरला व आपला देश, समाज संस्कृती यांचे संरक्षण , संवर्धन करणाऱ्या व महिलांचे हक्क यांचा विचार करणाऱ्या उमेदवारास मतदान करण्याचे आवाहन त्यांनी आपल्या बोलण्यात केले…

त्यामुळे आधुनिक काळात अहिल्याबाईंचा आदर्श घेऊन महिलांनी वैयक्तिक व सामाजिक पातळीवर अधिक सक्षमतेने कार्य करण्याची आवश्यकता प्रतिपादित केली.

अन्य लेख

संबंधित लेख