Saturday, May 25, 2024

शरद पवार यांच्याकडून संभ्रम निर्माण करण्यासाठी वक्तव्य केली जातात

Share

महाराष्ट्र : शरद पवार (Sharad Pawar) यांच्या एका वक्तव्यावरुन राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. शरद पवार यांनी एक मोठं विधान केलय. येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी (Congress) जवळीक साधतील तर काही विलिनीकरणाचा विचार करू शकतात असं विधान शरद पवारांनी केलं होत. आमची आणि काँग्रेसची विचारसरणी सारखी असल्याचे त्यांनी म्हटले होते. आपण पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मते घेऊन राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याबाबत निर्णय घेऊ, असे शरद पवार म्हणाले होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“शरद पवारांकडून संभ्रम निर्माण करण्यासाठी वक्तव्य केली जातात. त्यांना पाहिजे तेच ते करतात. तो त्यांचा स्वभाव आहे. तो बदलणे शक्य नाही. आम्हाला मध्येच ते म्हणतात मी निवृत्त होतो. परंतु त्यांच्या मनामध्ये वेगळेच असते. जे मनामध्ये असते तेच ते करतात. परंतु दाखवताना हा निर्णय सामूहिक असल्याचे दाखवतात. भाजप बरोबर जाण्याची चर्चा झाल्याचे शरद पवार आता किमान मान्य करत आहेत. यासाठी सहा बैठका झाल्या होत्या. जर भाजप सोबत जायचे नव्हते तर का झाल्या होत्या या बैठका?”, असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला.

अन्य लेख

संबंधित लेख