Thursday, October 24, 2024

काँग्रेसने जागा सोडली आहे का? अकोल्याच्या चावडीवर चर्चा रंगली

Share

आगामी विधानसभा निवडणुकीच्या राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. बाळापुर आणि अकोला पूर्व या दोन्हीही मतदारसंघात महाविकास आघाडी मध्ये जागा साठी रस्सीखेच सुरू होती मात्र आता या दोन्ही ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाने आपले उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेसने हे दोन्ही जागा सोडली असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघापैकी महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाला किती मतदारसंघ सुटतील याबाबत राजकीय चर्चा जोरात सुरू होती. अखेर बाळापूर आणि अकोला पूर्व ची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ठाकरे गटाच्या पहिल्या यादीत बाळापूर मधून विद्यमान आमदार नितीन देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर अकोला पूर्व मतदार संघातून शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

एका पाठोपाठ एक उमेदवार जाहीर होत. जवळपास सर्वच पक्षांकडून उमेदवारी जाहीर करण्यात येत आहेत. महाविकास आघाडीच्या एकाही घटकपक्षाने आतापर्यंत उमेदवार जाहीर केले नव्हते अखेर 23 ऑक्टोबर रोजी शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवार जाहीर करण्यात आली आहे. या उमेदवारी यादीत 65 जणांना तिकीट देण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे.

अन्य लेख

संबंधित लेख