Friday, September 13, 2024

‘या देशात एकच वाघ होऊन गेला, त्याचं नाव हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे’

Share

महाराष्ट्र : “काही नकली वाघ कल्याण-डोंबिवलीमध्ये येऊन गेले, पोकळ डरकाळ्या फोडून गेले, मात्र हा एकनाथ शिंदे रिंगमास्टर आहे, तोपर्यंत वाघाचे कातडे पांघरणाऱ्या शेळ्या कधीही वाघ होणार नाहीत. या देशात एकच वाघ होऊन गेला, त्याचं नाव हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आहे. त्यामुळे अयोध्येत राम मंदिर झालं. बाळासाहेब असते, तर भरभरून कौतुक केलं असतं.” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले.

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत मतदारसंघात केलेल्या विकासकामांचा सविस्तर लेखाजोखा असलेल्या ‘विकासदशक-दहा वर्ष प्रगतीची, कल्याणच्या समृद्धीची’ या कार्य अहवालाच्या प्रकाशन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डोंबिवलीत पार पडला, यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली.

अन्य लेख

संबंधित लेख