Saturday, May 25, 2024

बारामती:शरद पवारांच्या ‘बाहेरचे पवार’ वक्तव्यावर सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर

Share

Baramati Lok Sabha : राज्याचंच नव्हे तर देशभराचं लक्ष लागून असलेल्या बहुचर्चित बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघात पवार कुटुंबातील दोन सदस्यांमध्ये पहिल्यांदाच लढत पाहायला मिळत आहे. ‘मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार’ अशा शब्दात शरद पवार (Sharad Pawar) यांनी नाव न घेता सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यावर टीका केली. लेक अन सुनेच्या केलेल्या फरकावरून शरद पवारांना महिला नेत्यांच्या टीकेला सामोरे जावं लागत आहे. शरद पवारांच्या ‘बाहेरचे पवार’ या वक्तव्याबद्दल विचारले असता सुनेत्रा पवार भावूक झाल्या. अश्रू अनावर होऊन काहीच न बोलता निघून गेल्या.

इथून पेटला वाद

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) बारामतीमध्ये सभेत आवाहन केलं होतं की आता पवार आडनाव पाहून मतदान करा. इतके दिवस तुम्ही शरद पवारांना मत दिलंत, सुप्रियाला मत दिलंत, मला निवडून दिलंत. आता सुनेला निवडून द्या.असं अजित पवार म्हणाले होते.

अन्य लेख

संबंधित लेख