Wednesday, January 29, 2025

भोसरीत उद्या ‘हिंदू स्वाभिमान मेळावा’, डॉ. सुरेश चव्हाणके करणार मार्गदर्शन

Share

भोसरी : भोसरी (Bhosari) येथे उद्या जाती जातीत विखुरलेल्या हिंदू समाजाला एकत्रित आणण्यासाठी ‘हिंदू स्वाभिमान मेळावा’ (Hindu Swabhiman Melava) आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात सुदर्शन न्यूज चॅनेलचे प्रमुख आणि प्रखर हिंदुत्ववादी वक्ते डॉ. सुरेश चव्हाणके (Dr. Suresh Chavhanke) मार्गदर्शन करणार आहेत.

भोसरीच्या पांजरपोळ गोशाळा प्रांगणात बुधवार, २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या या जाहीर सभेचा उद्देश हिंदू समाजात स्वाभिमान वाढवणे, हिंदू परंपरांचे जतन करणे, आणि उत्सवांची महत्ता पटवून देणे आहे. हिंदू समाजावर होणाऱ्या लव्ह जिहाद, धर्मांतरण, गोहत्या आणि जमीन जिहाद यासारख्या अत्याचारांविरोधात जागृती निर्माण करण्यासाठी ही सभा आयोजित करण्यात आली आहे.

डॉ. सुरेश चव्हाणके यांच्या शिवप्रेरणा यात्रेचा एक भाग असलेल्या या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी सकल पिंपरी चिंचवड हिंदू समाजाने हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

अन्य लेख

संबंधित लेख