Friday, September 20, 2024

रावसाहेब दानवेंवर भाजपाने सोपवली मोठी जवाबदारी

Share

भारतीय जनता पक्षाने (भाजप) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवेंवर मोठी जबाबदारी सोपवली आहे. विधानसभेची निवडणूक जवळ आल्यामुळे सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कंबर कसली आहे अनेक नेत्यांचे राज्यभर दौरे सुरु आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, रावसाहेब दानवे यांना भाजपाच्या निवडणूक संयोजकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ही नियुक्ती विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या रणनीती आणि संघटनात्मक कार्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत निवडणुकीबाबत चर्चा झाली .या नियुक्तीमुळे रावसाहेब दानवे यांच्यावर पक्षाच्या संघटनात्मक कार्याची आणि निवडणूक प्रचाराची जबाबदारी आली आहे, जे पक्षाच्या विधानसभा निवडणुकीतील यशाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. हे निर्णय भाजपाच्या आगामी निवडणूक रणनीतीचा भाग आहे आणि रावसाहेब दानवे यांच्या अनुभव आणि कार्यक्षमतेवर आधारित आहे

तसेच विधानसभेसाठी भाजपाचा प्लॅन काय असेल? हे बघण्यासारखे असेल.

अन्य लेख

संबंधित लेख