Tuesday, December 3, 2024

मनुष्याचा जन्म मिळणे हाच गौरव – डॉ. आशुतोष काळे

Share

पुणे, दिनांक १९ ऑक्टोबर ः वैयक्तिक आणि अध्यात्मिक प्रगतीबरोबरच समाजासाठी कर्तव्य बुद्धीने कार्य करणे महत्त्वाचे आहे. पुढील पिढीला संस्कारक्षम करणे ही आपली जबाबदारी असून, यासाठी मनुष्याचा जन्म मिळणे हाच गौरव आहे. असे मत जनकल्याण रक्तपेढीचे डॉ. आशुतोष काळे यांनी व्यक्त केले.

अमित ब्लूमफिल्ड मधील स्वाध्याय परिवाराच्या वतीने प.पु. पांडुरंगशास्त्री आठवले यांचा जन्मदिन “मनुष्य गौरव दिन” म्हणून साजरा करण्यात आला होता. या वेळी डॉ. काळे यांनी ‘मनुष्य जन्माचे महत्त्व’ या विषयावर प्रबोधन केले. ते म्हणाले,”आज आपल्या सनातन संस्कृतीवर जे हल्ले  होत आहेत. त्यांना तोंड देऊन समाजात गीतेचे विचार पोहचवणे हि आपली जबाबदारी आहे. तसेच सदाचार, नियम पाळणे,समाजासाठी कार्य करणे, मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे.” लोकशाही मार्गाने आपल्या संस्कृती संवर्धनासाठी आपण मतदानासारखी विविध आयुध वापरून आपले कर्तव्य बजावले पाहिजे, असेही ते म्हणाले. या प्रसंगी स्वाध्याय परिवारातील वासंती जाधव, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश मरकळे, सचिव श्याम पराते, पुष्पलता खांबे, शैला मांढरे आदी उपस्थित होते.

अन्य लेख

संबंधित लेख