Thursday, October 24, 2024

कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Share

पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रमुख व्यक्ती आणि विद्यमान उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघातून (Kothrud Assembly Constituency) आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी अधिकृतपणे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पुण्यातील या महत्त्वाच्या जागेवरून भारतीय जनता पक्षाने (भाजप) उमेदवारी जाहीर केल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी आज अर्ज भरला.

उमेदवारी दाखल केल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजप नेतृत्वाने सलग दुसऱ्यांदा आपल्यावर विश्वास दाखविल्याबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच लोकसभा निवडणुकीत कोथरूडकर जनतेने भारतीय जनता पक्षावर भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिले. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना ७५ हजारांपेक्षा जास्त मताधिक्याने विजयी बनवले. त्यामुळे आजच्या रॉलीला मिळालेला प्रतिसाद पाहून कोथरुड विधानसभा मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने विजयी होईल, असा विश्वास व्यक्त केला.

कोथरूड विधानसभा मतदारसंघ, पुण्याच्या राजकीय परिदृश्यातील वैविध्यपूर्ण मतदार आणि धोरणात्मक महत्त्वासाठी ओळखला जाणारा हा मतदारसंघ अलीकडच्या निवडणुकीत भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. पाटील यांचा आज उमेदवारी दाखल करण्या अगोदर समर्थक आणि कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

महाराष्ट्रातील बदलती राजकीय घडामोडी आणि पुण्यासारख्या शहरी केंद्रांवर आपली पकड कायम ठेवण्याची भाजपची आकांक्षा पाहता पाटील यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. त्यांच्या प्रचारात विकास, शिक्षण आणि पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करणे अपेक्षित आहे, ज्या भागात त्यांनी मंत्री म्हणून आपल्या कार्यकाळात आपली छाप सोडली आहे.

दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी नामदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज सकाळी शंकर महाराज, कसबा गणपती, मृत्यूंजयेश्वर मंदिराचे दर्शन घेतले. त्यानंतर डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. कोथरूड मधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात झाली. या वेळी कोथरुड मधील प्रत्येक नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाला होता.

उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, कोथरुडच्या जनतेने भारतीय जनता पक्षावर नेहमीच भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिले आहेत.‌देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचे गेल्या १० वर्षातील विकासकामे, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची राज्यभरातील सर्व सामान्य नागरिकांसाठी राबविलेल्या योजना आणि कोथरुडचे आमदार म्हणून चंद्रकांतदादा पाटील यांनी गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात राबविलेले सेवा उपक्रम आणि विकासकामे यामुळे कोथरुडची जनता समाधानी आहे. त्यामुळे कोथरूड मधून नामदार चंद्रकांत पाटील मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून पुन्हा शपथ घेणार असा विश्वास केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी व्यक्त केला.

अन्य लेख

संबंधित लेख