Friday, November 21, 2025

संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिवादन

Share

मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या (Maharashtra) लढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी आज, २१ नोव्हेंबर हा दिवस ‘महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृति दिन’ (Hutatma Smruti Din) म्हणून पाळला जातो. या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हुतात्मा चौक येथील स्मृतिस्थळावर पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

हुतात्म्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमास स्मृतिस्थळावर विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कौशल्य, रोजगार, उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई मनपाचे आयुक्त भूषण गगराणी, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, पोलीस आयुक्त देवेन भारती यांनीही पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी विविध पदाधिकारी, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

अन्य लेख

संबंधित लेख