Wednesday, December 10, 2025

‘कोण होतास तू, काय झालास तू?’ फडणवीसांनी अमित शाहांचा व्हिडिओ ट्विट करत उद्धव ठाकरेंना डिवचले; ‘व्होट बँक’साठी हिंदुत्व सोडल्याचा हल्ला!

Share

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर सुरू झालेले राजकीय युद्ध अद्यापही शमलेले नाही. त्यातच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांचा संसदेतील व्हिडिओ ट्विट करत शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जोरदार डिवचले आहे. ‘कोण होतास तू, काय झालास तू?’ असे म्हणत फडणवीसांनी ठाकरेंवर हिंदुत्व सोडून अल्पसंख्यांकांची मते मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी संसदेत केलेल्या भाषणात उद्धव ठाकरे यांच्यावर थेट हल्ला चढवला. अमित शहा यांनी पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर सोनिया गांधींचा निवडणुकीतील विजय ही सर्वात मोठी व्होटचोरी असल्याचा गंभीर आरोप केला. सध्या न्यायाधीशांच्या निर्णयावरही आक्षेप घेतला जात आहे, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एखाद्या न्यायाधीशांविरुद्ध महाभियोग (Impeachment) प्रस्ताव दाखल करण्यात येत आहे.

“उद्धव ठाकरेंनीही व्होट बँकेसाठी महाभियोग प्रस्तावावर सही केली आहे. त्यांनीही मतपेढीचे राजकारण केले आहे,” असे म्हणत शहा यांनी ठाकरेंना लक्ष्य केले. ‘महाभियोग’ प्रस्ताव एका डोंगरावर सर्वांत उंच दिवा पेटवला जावा, या निर्णयावरून आला असल्याचे शाहा यांनी स्पष्ट केले.

अमित शाहा यांच्या याच आक्रमक भाषणाच्या व्हिडिओ क्लिपचा वापर करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. सीएम देवेंद्र फडणवीसांनी ‘X’ (ट्विटर) वर हा व्हिडिओ शेअर करत, “कोण होतास तू, काय झालास तू?” असे थेट विधान करत, ठाकरे गटाने केवळ मतांसाठी हिंदुत्वाची भूमिका सोडल्याचा अप्रत्यक्षपणे जोरदार प्रहार केला आहे. यामुळे राज्यातील भाजप आणि उबाठा यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1998749215925874703

मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी सुद्धा ट्विटद्वारे उबाठा गटावर तीव्र टीका केली आहे. साटम म्हणाले की, कार्तिगै दीपमच्या बाजूने निकाल देणाऱ्या न्यायमूर्तींच्या इम्पीचमेंटच्या नोटीसवर उबाठाचे खासदार अरविंद सावंत यांनी सही केली असून, कशाप्रकारे हिंदुत्व विरोधी भूमिका उबाठा मतांच्या लांगुलचलनाकरिता घेत आहेत, याचं हे उत्तम उदाहरण आहे.

https://twitter.com/AmeetSatam/status/1998676965583187976?s=20

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली देण्याचं काम उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील उबाठा गट करत आहे. येणाऱ्या काळामध्ये मुंबई शहराचा रंग बदलण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, आणि अशा सर्व शक्तींना मुंबईकर येणाऱ्या काळामध्ये घरी बसवल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही साटम यांनी दिला आहे.

अन्य लेख

संबंधित लेख