Sunday, September 8, 2024

मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि पवार दिल्लीत, राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय

Share

महाराष्ट्र : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आज नीती आयोगाच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी दिल्लीत (Delhi) पोहोचले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्यासह सर्व राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत केंद्र सरकारच्या ‘विकसित भारत २०४७’ या महत्त्वाकांक्षी योजनेवर चर्चा होईल. आजच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यापेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे पण आज दिल्ली दौऱ्यावर असल्यामुळे यांचीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चालू आहे. या दिल्लीच्या भेटीत महायुती आघाडीच्या नेत्यांची जागावाटपावर चर्चा होणार? हे पाहावे लागेल.

या वर्षाच्या अखेरीस राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. त्यासाठी आतापासूनच सर्व पक्षांनी आपली कंबर कसली आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांचा समावेश असलेली महायुती आघाडी निवडणुकीपूर्वी आपल्या पारड्यात जास्तीत जास्त जागा पडून घेण्यासाठी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींशी चर्चा करत आहेत. अशातच महाराष्ट्रातील हे तीनही नेत्यांच्या दिल्ली दौऱ्याकडे महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले आहे. दिल्लीत असताना, हे नेते आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटप व्यवस्थेसह राज्यातील विविध मुद्द्यांवर चर्चा करतील असं अपेक्षित आहे.

अन्य लेख

संबंधित लेख