Wednesday, December 4, 2024

परभणीमध्ये चमत्कार घडणार; महादेव जानकर दिल्लीत जाणार

Share

परभणी लोकसभा मतदारसंघ : “बारामतीत साडेतीन लाखांचा लीड ३४ हजारांवर आणणारे महायुतीचे उमेदवार महादेव जानकर आहेत. तेव्हा इतिहास घडवला असता. मात्र आता ते परभणीत (Parbhani) इतिहास घडविणार आहेत. परभणीमध्ये चमत्कार घडणार आणि महादेव जानकर (Mahadev Jankar) नक्की दिल्लीत खासदार म्हणून बहुमताने विजयी होऊन जातील असा विश्वास” राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त केला.

परभणी लोकसभा मतदारसंघातील (Parbhani Loksabha Constituency) महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारासाठी काल दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी पाथरी येथे आले होते. यावेळी ते म्हणाले, एका सर्वसामान्य शिवसैनिक, शेतकरी कुटुंबातील व्यक्ती मुख्यमंत्री झाल्याने काहींच्या पोटात पोटदुखी सुरू झाली आहे. त्यामुळेच ते माझ्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत. शिव्या देत आहेत. पण हा शिवीगाळ मलाच नव्हे तर राज्यातील शेतकरी, कष्टकरी, मराठा आणि बहुजनांनाही आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जे जन्माला आले, त्यांच्यावर योग्य संस्कार मात्र झालेले नाहीत. अशांच्या आरोपांना कामातून उत्तर देऊ असे शिंदे यावेळी म्हणाले .

महादेव जानकार यांना १७ भाषा येतात. खासदार म्हणून दिल्लीत गेल्यावर विकास आणि प्रगतीची भाषाही ते शिकतील आणि परभणीच्या विकासासाठी आकाश पाताळ एक करतील. सर्वांगीण विकास आणि प्रगतीसाठी महादेव जानकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी, पाथरी येथील श्री साईबाबांच्या मंदिरास भेट देत दर्शन घेतले.

अन्य लेख

संबंधित लेख