Tuesday, September 17, 2024

काँग्रेसचा महिलाविरोधी अजेंडा पुन्हा समोर, ‘लाडकी बहीण योजने’ विरोधात याचिका

Share

मुंबई : ‘लाडकी बहीण योजने’ (Ladki Bahin Yojana) विरोधात काँग्रेस (Congress) कार्यकर्त्याने याचिका केली असून काँग्रेसचा महिलाविरोधी अजेंडा पुन्हा एकदा उघड झाला आहे, असा घणाघात महाराष्ट्र भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केलाय. वाघ यांनी “X” वर पोस्ट करत काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेसचा महिलाविरोधी खरा चेहरा पाहू या. त्यासाठी आधी त्यांचा महिला विरोधी बुरखा फाडू या. असं त्या म्हणाल्या.

चित्रा वाघ म्हणाल्या कि, “काँग्रेसचे नेते सुनील केदार यांचा कट्टर कार्यकर्ता असलेल्या अनिल वडपल्लीवार याने एक उचापत करून ठेवली आहे. आपल्या ‘लाडकी बहीण योजने’ विरोधात या महाशयांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यापूर्वीसुद्धा काँग्रेसनं आपल्या लाडक्या बहिणींच्या विरोधात कोर्टात धाव घेतली होती, तेव्हा कोर्टानं त्यांचं थोबाड फोडलं होतं. आता, पुन्हा एकदा काँग्रेसचा बेगडीपणा उघड झाला आहे.”

महाभकास आघाडीचा ‘लाडकी बहीण योजने’ विरोधातील अजेंडा अनिल वडपल्लीवार यांच्या मार्फत राबवला जात आहे, हे आता स्पष्ट झालं आहे. या नतद्रष्ट काँग्रेसचा महिला विरोधी खरा चेहरा पुन्हा एकदा महाराष्ट्रासमोर आला आहे, हे निश्चित ..

तसेच त्यांनी महिलांना आवाहन केलं कि, “माझ्या लाडक्या बहिणींनो जरा जपून, या महिलाविरोधी काँग्रेसला आणि त्यांच्या महाभकास बिघाडीला आगामी निवडणुकीत आपल्याला धडा शिकवायचा आहे बरं का. आणि हो काळजी करू नका बरं असे किती ही नतद्रष्ट आले तरी महायुतीचे महाभक्कम सरकार तुमच्या पाठीशी सक्षमपणे उभे आहे, असे त्या म्हणाल्या

अन्य लेख

संबंधित लेख